जुई गडकरी ह्या मालिकेद्वारे करणार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 06:00 AM2018-11-05T06:00:00+5:302018-11-05T06:00:00+5:30

 'वर्तुळ' ही मालिका १९ नोव्हेंबर पासून रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Jube Gadkari will be seen in this serial | जुई गडकरी ह्या मालिकेद्वारे करणार कमबॅक

जुई गडकरी ह्या मालिकेद्वारे करणार कमबॅक

googlenewsNext
ठळक मुद्दे'वर्तुळ' मालिकेत फॅमिली सस्पेन्स

झी युवाने अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीतच वैविध्यपूर्ण मालिका सादर करून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या कथा आणि त्यांच्या सादरीकरणातील नावीन्य यामुळे झी युवा या वाहिनीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. झी युवा लवकरच आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी 'वर्तुळ' ही नवी मालिका सादर करणार आहे. नावाप्रमाणेच ही मालिका आयुष्याचे वर्तुळ दर्शवणारी आहे. तसेच ही मालिका एक फॅमेली सस्पेन्स आहे. ही मालिका नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.   


मालिकेचे कथानक अगदी रंजक असून, ही कथा मीनाक्षी नावाच्या एका अनाथ मुलीची आहे जिचा भूतकाळ तिच्या भविष्यकाळात डोकावतो आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला. जुई गडकरी बऱ्याच काळानंतर मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जुई मीनाक्षीची भूमिका साकारणार आहे. तर अभिजित परांजपे हा कथेचा नायक असून ही भूमिका विकास पाटील साकारणार आहे. मिनाक्षी आणि अभिजीतची भेट अपघाताने होते. मीनाक्षीने तिच्या
भूतकाळातील काही गोष्टी तिच्या मनात दडवून ठेवल्या आहेत. तिचा भूतकाळ अशा काही प्रकारे तिच्यासमोर येतो की मीनाक्षीच्या पायाखालची जमीन सरकते.  अभिजीत सोबत निर्माण झालेल्या विश्वासाच्या नात्याला मिनाक्षीच्या भूतकाळाने तडा जाणार का? त्यांचे नाते टिकून राहणार का?
मीनाक्षीचा भूतकाळ नक्की काय आहे? ती सगळ्यांपासून काय लपवतेय? याचा उलगडा लवकरच झी युवा वाहिनीवर 
होणार आहे. 'वर्तुळ' ही मालिका १९ नोव्हेंबर पासून रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
 

Web Title: Jube Gadkari will be seen in this serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.