'Jijaji is on the roof' Lessons of the fifth warning | ​'जिजाजी छत पर है'मध्ये पंचम देणार स्वरक्षणाचे धडे
​'जिजाजी छत पर है'मध्ये पंचम देणार स्वरक्षणाचे धडे
सोनी सबवरील 'जिजाजी छत पर है' ही मालिका आपल्या नव्या आणि आगळ्यावेगळ्या पटकथेने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेने अनेक सामाजिक मुद्द्यांना हात घातला आहे, शिवाय अनेक बाबतीत जनजागृतीचाही प्रयत्न केला आहे. आताच्या भागात आपले लाडके कलाकार त्यांच्या अनोख्या शैलीत महिलांच्या छेडछाडीचा प्रश्न हाताळणार आहेत.
येत्या भागात ईलायची (हिबा नवाब) तिच्या भागात होणारी महिलांची छेडछाड, त्यांना त्रास देणे अशा समस्यांविरुद्ध लढताना दिसणार आहे. मुन्नाच्या टोळीतील मुलं आपली छेड काढत असल्याची तक्रार सुनिता (राशी बावा) ईलायचीकडे करते. ईलायची त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेते. ती पंचमला आपल्याला मार्शल आर्ट शिकवण्याची विनंती करते, जेणेकरून ती स्वसंरक्षण करू शकेल. पंचम चांदनी चौकातल्या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यास सुरुवात करतो.
मुन्नाच्या गँगला धडा शिकवण्याच्या हेतून ईलायची एक योजना आखते आणि मुन्नाला तिची छेड काढण्यास उद्युक्त करते. त्याने तसं करताच पंचम (निखिल खुराणा) आणि सुनिता त्याच्यावर शेणाचे गोळे फेकतात. ईलायची आपल्या अनोख्या मार्शल आर्टच्या पद्धती वापरून मुन्ना आणि गँगविरोधात लढते. त्यानंतर हे तिघे संपूर्ण चांदनी चौकात महिलांची छेड काढणाऱ्या पुरुषांना धडा शिकवण्याच्या मोहिमेवर निघतात.
चांदनी चौकातील इसमाविरुद्ध केलेल्या गमतीचे काही परिणाम ईलायचीला भोगावे लागतील का? चार लोकात झालेल्या या अपमानाचा बदला आता ते कसा घेतील?
या कथानकाबद्दल हिबा नवाब म्हणजेच ईलायची सांगते, "स्वसंरक्षणाच्या या भागात देशभरातील महिलांसाठी एक ठोस संदेश आहे. हल्लीच्या युगात स्वसंरक्षण अत्यंत आवश्यक आहे आणि प्रत्येक मुलीने छेडछाडीला विरोध करायला हवा आणि त्याविरुद्ध लढायला हवं. या भागाचे चित्रीकरण करताना फार मजा आली आणि आम्ही युट्युबवरून काही मार्शल आर्ट ट्रिक्सही शिकलो. हे शिकणं फारच मस्त होतं आणि मला वाटतं प्रत्येकाला थोडं फार तरी स्वसंरक्षण यायलाच हवं."
'जिजाजी छत पर हैं' या मालिकेचे आगामी भाग प्रेक्षकांना आवडतील अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 

Also Read : वाचा जिजाजी छत पर है या मालिकेतील हिबा नवाब, राशी बावा आणि निखिल खुराना काय सांगतायेत त्यांच्या मैत्रीविषयी
Web Title: 'Jijaji is on the roof' Lessons of the fifth warning
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.