Jiah Shankar took inspiration from Kareena Kapoor in 'My harmful wife' | 'मेरी हानिकारक बीवी'मध्ये जिया शंकरने घेतली करीना कपूरकडून प्रेरणा

आपल्या वेगळ्या संकल्पना आणि गमतीशीर प्रोमोजमुळे सध्या 'मेरी हानिकारक बीवी' या मालिकेची चर्चा आहे. नसबंदी हे मालिकेचे ठळक वैशिष्ट्य असून अखिलेश (करण सूचकद्वारे) आणि डॉ. ईरा (अभिनीत व्यक्तिरेखा) यांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कथा आहे.यातील व्यक्तिरेखेत खास वैशिष्टय आहेत.मालिकेतील व्यक्तिरेखा या  बॉलिवुडमधील काही व्यक्तिरेखांशी साधर्म्य असणा-या आहेत.डॉ. ईरा देसाईच्या भूमिकेत दिसणार्‍या जिया शंकरची व्यक्तिरेखा ही ‘3 इडियट्स’ या लोकप्रिय सिनेमातील करिना कपूरच्या पिया सहस्त्रबुद्धे या व्यक्तिरेखेशी मिळतीजुळती आहे.डॉ. पियाप्रमाणेच या मालिकेत डॉ. ईरा ही हुशार, कठोर मनाची आणि व्यावहारिक मुलगी आहे.लोकसंख्येवर नियंत्रण असावे अशी तिची स्वतःची धारणा असते.अखिलेश पांडे तिच्या आयुष्यात येतो आणि त्यांच्यामध्ये ज्याप्रकारे गैरसमज निर्माण होतात तिथून खर्‍या कथेला सुरुवात होते.यासंदर्भात जिया शंकरने सांगितले '3 इडियट्स’ मधील करीना कपूरच्या व्यक्तिरेखेची खरंच मी चाहती आहे आणि हा चित्रपट मी खूप वेळा पाहिला आहे.अखिलेशला भेटल्यानंतर त्याच्याबद्दल गैरसमज करून घेणार्‍या डॉ. ईराच्या भूमिकेबद्दल मला विचारण्यात आले, तेव्हा लगेच मला करिनाची ही भूमिका आठवली. त्यानंतर मी तिची ही भूमिकेचा करिनाने कशी रंगवली आहे त्यासाठी अनेकवेळी मला हा चित्रपटही पाहावा लागला. करिना सारखी भूमिका केली नसली तरी चांगली भूमिका साकारण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.रसिकांना ही मालिका आवडेल आणि माझ्या भूमिकाही त्यांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरेल अशी मला आशा असल्याचे तिने सांगितले.”

cnxoldfiles/a>या मालिकेमध्‍ये असणार आहे. 'बागबान' आणि 'वझीर' यांसारख्‍या सुपरहिट बॉलिवुड चित्रपटांमध्‍ये दिसलेला हा अभिनेता 'मेरी हानिकारक बीवी' या मालिकेमध्ये अखिलेशच्‍या वडिलांची म्हणजेच ब्रिजेशची भूमिका साकारणार आहे.
Web Title: Jiah Shankar took inspiration from Kareena Kapoor in 'My harmful wife'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.