Jedi Majethia and Aishish Kapadia came together for the series | जेडी मजेठिया व आतिष कपाडिया 'ह्या' मालिकेसाठी आले एकत्र
जेडी मजेठिया व आतिष कपाडिया 'ह्या' मालिकेसाठी आले एकत्र

ठळक मुद्दे 'भाकरवडी' विनोदी मालिका लवकरच होणार दाखल


सोनी सब जेडी मजेठिया व आतिष कपाडिया यांच्‍या सहयोगाने आणखी एका उत्‍साहपूर्ण मालिकेसह रसिकांच्या भेटीला येत आहे. पुण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर असलेली 'भाकरवडी' ही एक विनोदी मालिका प्रसारीत होणार आहे. या मालिकेमध्‍ये भाकरवडी व्‍यवसायामध्‍ये एकमेकांशी स्‍पर्धा करणाऱ्या मराठी व गुजराती कुटुंबांमधील वैचारिक वाद यात पहायला मिळणार आहे.
या मालिकेत देवेन भोजानी व परेश गनात्रा सारखे प्रतिभावान कलाकार आहेत, जे दीर्घकाळानंतर टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत.


या मालिकेबाबत निर्माता जेडी मजेठिया म्‍हणाले, खिचडी, बा बहू और बेबी आणि साराभाई वर्सेस साराभाई अशा सर्वोत्‍तम मालिकांचे निर्माते असल्‍याने प्रेक्षक परिवार आमच्‍याकडून अधिक अपेक्षा करतात. आम्‍ही त्‍यांच्‍या अपेक्षा पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. भाकरवडी ही पूर्णत: कौटुंबिक मनोरंजन देणारी मालिका आहे. या मालिकेमध्‍ये भावना, विनोद, ड्रामा,
प्रेमकथा आणि भरपूर मनोरंजन असणार आहे. वास्‍तविक जीवनाला दाखवणारी ही भाकरवडी मालिकासोनी सबवर प्रमुख मालिका म्‍हणून सादर करण्‍यात येईल. 


आतिष कपाडिया म्‍हणाले, भाकरवडी ही जीवनातील वास्‍तव्‍याला सादर करणारी विनोदी टीव्‍ही मालिका आहे. ही मालिका अगदी भाकरवडीप्रमाणे आहे, ज्‍यामध्‍ये भरपूर स्‍वादिष्‍ट घटक असतात.
पुण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीला दाखवणारीही मालिका मराठी व गुजराती कुटुंबांमधील वैचारिक वादाला दाखवते. तसेच या वादाभोवती एक प्रेमकथा देखील आहे. विनोदी पद्धतीने नाते व कुटुंबाच्‍या खास साराला सादर करणारी मालिका भाकरवडीमध्‍ये गुजराती व मराठी चित्रपटसृष्‍टीतील काही लोकप्रिय व प्रतिभावान कलाकार असणार आहेत. मालिका लवकरच सोनी सबवर सुरू होणार आहे.


Web Title: Jedi Majethia and Aishish Kapadia came together for the series
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.