पार्टी तो बनती है म्हणत 'जमाई राजा' फेम रवी दुबेने नुकताच त्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला.यावेळी टीव्ही इंडस्ट्रीतले सगळ्या कलाकरांनी या बर्थ डे पार्टीला हजेरी लावली होती. पार्टी म्हटल्यावर काही हटके ड्रेसिंग स्टाइल करत कलाकार प्रत्येक पार्टीला चारचाँद लावतात. त्याचप्रमाणे या पार्टीतही कलाकारांचा निराळा अंदाज दिसला. विशेष म्हणजे रवीला शुभेच्छा देण्यासाठी न्युली मॅरिड कपल किश्वर मर्चंट - सुयश राय आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम करण मेहराही पार्टीत उपस्थित होता. यावेळी किश्वर मर्चंटने फुल ऑन मुडमध्ये डान्स करत मजा मस्ती केली.या कलाकारा व्यतिरिक्त या पार्टीत निया शर्मा,ऋत्विक धंजानी,मियांग चैंग, इंद्रनील सेन गुप्ता,अर्जुन बिजलानी,मौली गांगुली,शशांक व्यास,करन पटेल आणि वाहबिज दोराबजी कलाकारांच्या उपस्थितीत धमाकेदार पार्टी सा-यांनी एन्जॉय केली. या टीव्ही स्टारशिवाय दिग्दर्शक   साजिद खानचीही विशेष उपस्थिती होती.पाहुयात रवी दुबेच्या पार्टीतल्या कलाकारांचा खास अंदाज. 
Web Title: 'Jamai Raja' Fame Ravi Dubey's Birthday Celebration reached the final TV stars!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.