'Jai Kanhaiya Lal Ki' Artists gave a great tribute to the cause of this treat! | ‘जय कन्हैय्या लाल की’च्या कलाकारांना विशाल वशिष्ठने या कारणामुळे दिली ट्रीट!

एखाद्या व्यक्तीच्या हृदयावर राज्य करायचे असेल, तर त्याचा मार्ग तिच्या पोटातून जातो- मग ती व्यक्ती स्त्री असो की पुरुष.आणि जेव्हा तोंडाला पाणी सुटेल असा बिर्याणीचा बेत असेल,तेव्हा वाटणा- आनंदाला सीमा राहात नाही.नुकतेच सुरू झालेल्या प्रसारित होऊ लागलेल्या ‘जय कन्हैय्या लाल की’ या मालिकेचे कलाकार आणि कर्मचा-यांना अलीकडेच असा अनुभव आला. त्याला कारण होते,या मालिकेचा नायक विशाल वशिष्ठने या सर्वांना चमचमीत बिर्याणी करून खायला घातली, हे विशेष म्हणजे त्याने स्वत: ही बिर्याणी आपल्या हाताने शिजविली होती.असा सहकर्मचारी असेल,तर काम करण्यास कोणाला आनंद वाटणार नाही? सर्वांना ही मेजवानी देणारा विशाल वशिष्ठ म्हणाला, “मला नव्यानेच स्वैपाकाची आवड निर्माण झाली असून त्यामुळे सेटवरील सर्वांना आश्चर्याचा धक्का देण्याचा मी विचार केला. सर्वांना खाना खिलविण्यासाठी कोणता पदार्थ निवडावा,यावर मी विचार केला आणि बिर्याणी हाच मला त्यातल्या त्यात योग्य पर्याय वाटला.त्यामुळे मी सर्वांसाठी बिर्याणीचा बेत आखला.कन्हैय्यातील भूमिकेवरून प्रेरणा घेऊन मी त्यादिवशी सेटवर बावर्चीच बनलो.मी बनविलेली बिर्याणी सर्वांनाच फार आवडल्याने माझा मेजवानीचा बेत यशस्वी झाला, असंच मी म्हणेन.”

Also Read:बंगाली अभिनेत्री स्वेता भट्टाचार्य या मालिकेद्वारे करणार हिंदी टेलिव्हिजनवर पदार्पण

लोकप्रिय बंगाली टीव्ही अभिनेत्री स्वेता भट्टाचार्य 'जय कन्हैय्या लाल की'याच मालिकेच्या माध्यमातून पदार्पण केले आहे.स्वेता यात दालीची भूमिका करणार असून ती ह्या शोमधील एक श्रीमंत आणि अतिशय लाडावलेली मुलगी आहे.स्वेता म्हणाली,“जय कन्हैय्या लाल कीचा हिस्सा बनताना मला खूप छान वाटतंय.मी ह्या शोसाठी होकार दिला कारण याचे कथानक खास आहे.जेव्हा निर्मात्यांनी मला ही कथा ऐकवली तेव्हा मी नाही म्हणूच शकले नाही.ह्या शोमधील अतिशय आव्हानात्मक भूमिका मी साकारणार आहे.मला आशा आहे की माझ्या चाहत्यांना माझे प्रयत्न आवडतील.”
Web Title: 'Jai Kanhaiya Lal Ki' Artists gave a great tribute to the cause of this treat!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.