'Jago Mohan Pyare' will soon be aired for the audience, the horror series will take place 'eclipse' | ‘जागो मोहन प्यारे’ लवकरच घेणार रसिकांचा निरोप?, हॉरर मालिका ‘ग्रहण’ घेणार जागा

छोट्या पडद्यावरील रसिकांच्या लाडक्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'जागो मोहन प्यारे'.गेल्या काही महिन्यांपासून ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे.अभिनेता अतुल परचुरे,अभिनेत्री श्रृती मराठे आणि सुप्रिया पाठारे यांच्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केले आहे.या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आणि मालिकेचे कथानक रसिकांना भावली आहे.श्रृतीने साकारलेली भानु आणि तिच्या मालकाच्या भूमिकेतील अतुल परचुरे रसिकांच्या मनात घर करुन गेले आहेत.मालिकेचे कथानकही तितकंच रंजक आणि विनोदी आहे.मात्र रसिकांची ही लाडकी मालिका जागो मोहन प्यारे छोट्या पडद्यावरुन निरोप घेण्याची शक्यता आहे.लवकरच जागो मोहन प्यारे या मालिकेच्या जागी ग्रहण ही नवी मालिका रसिकांच्या भेटीला दाखल होणार आहे.या नव्या मालिकेचे प्रोमो सध्या छोट्या पडद्यावर झळकू लागले आहेत.प्रोमोवरुन या मालिकचे कथानक रहस्यमयी किंवा हॉरर स्वरुपाचे असेल असंच दिसतंय.त्यामुळे 'रात्रीस खेळ चाले' आणि '१०० डेज' या मालिकानंतर रात्री साडेदहा वाजता पुन्हा एकदा हॉरर कथानक असलेली मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री पल्लवी जोशी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत.याआधी विविध रिअॅलिटी शोचं विशेषतः संगीत रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करत रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या पल्लवी जोशी या मालिकेत झळकणार आहेत.या मालिकेत पल्लवी जोशी यांचा हटके आणि अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे.विविध सिनेमांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.'असंभव' आणि 'अनुबंध' या मराठी मालिकांची तर 'आरोहण' या हिंदी मालिकेची निर्मिती देखील पल्लवी जोशी यांनी केली आहे.अलीकडेच 'मेरी आवाज ही पहचान है' या मालिकेद्वारे त्यांनी हिंदीमध्ये कमबॅक केलं होतं.'पेशवा बाजीराव' या मालिकेत त्या ताराबाईंच्या भूमिकेत झळकल्या होत्या.आता 'ग्रहण' या मालिकेतील त्यांच्या भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.'माझ्या नव-याची बायको' या मालिकेचे निर्माते तेजेंद्र नेसवणकर यांनी ग्रहण या मालिकेची निर्मिती केली आहे. Web Title: 'Jago Mohan Pyare' will soon be aired for the audience, the horror series will take place 'eclipse'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.