Iyer and Jethalal in a series of reverse chakra in Tarak Mehta's series will again get a fight | ​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत अय्यर आणि जेठालालची पुन्हा होणार भांडणं

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत अय्यर आणि जेठालाल यांची भांडणं आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी अय्यरने जेठालालच्या दुकानातून एक वॉशिंग मशिन घेतली होती. पण ही मशिन रात्रीतून अचानक हलायला लागल्याने अय्यर प्रचंड घाबरला होता. त्यात भूत आहे असे त्याला वाटत होते. या मशिनमुळे गोकुळधाम सोसायटीमधील सगळेच टेन्शनमध्ये आले होते. पण या मशिनमध्ये उंदिर असल्याने ती मशिन हलत असल्याचे काही वेळानंतर सगळ्यांना कळले. मात्र या दरम्यान अय्यर आणि जेठालाल यांच्यात प्रचंड भांडणे झाली होती आणि आता या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद रंगणार आहे. 
गोकुळधाम सोसायटीत तिरंगा फडकवण्यासाठी यावर्षी कोणत्याही सेलिब्रिटीला बोलवण्यापेक्षा सोसायटीमधील एखाद्या व्यक्तीने तिरंगा फडकावा असे सगळे मिळून ठरवतात. त्यामुळे प्रत्येक जण आपल्याला संधी का मिळावी याबद्दल सोसायटीच्या मिटींगमध्ये आपली बाजू मांडतो. अय्यर सांगतो, मी वैज्ञानिक असल्याने मला संधी मिळावी तर भिडे मी एक शिक्षक असल्याने झेंडा फडकवण्यासाठी मीच योग्य असल्याचे सांगतो. तर मी डॉक्टर असल्याने अनेकांचे जीव वाचवले आहेत त्यामुळे मला ही संधी मिळावी असे डॉ. हाथी सांगतो तर मी पुस्तकांद्वारे लोकांचे मन जिंकतो. त्यामुळे मी झेंडा फडकवणार असे मेहता सगळ्यांना सांगतो तर जेठालाल मी व्यापारी असल्याने माझ्याशिवाय कोण काही कामच करू शकत नाही असे सांगत आपली बाजू मांडतो. प्रत्येकजण आपल्या मतावर ठाम असल्याने लकी ड्रा द्वारे हा निर्णय घेण्याचे ठरवले जाते. त्याप्रमाणे सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये टाकल्या जातात आणि त्यातून जेठालालच्या नावाची चिठ्ठी निघते. या निर्णयामुळे जेठालाल प्रचंड खुश होतो आणि ही बातमी आपल्या नातलगांना, मित्रमैत्रिणींना सांगतो. एवढेच नव्हे तर झेंडा फडकवताना त्याचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्सनादेखील बोलावतो. 
स्वातंत्र्यदिनाची जोरात तयारी गोकुळधाम सोसायटीत सुरू होते आणि जेठालाल झेंडा फ़कवण्यासाठी खूप उत्सुक असतो. झेंडा आणण्याची जबाबदारी अय्यरला दिली जाते. पण अय्यर झेंडा रिक्षातच विसरतो. त्यामुळे आता या कारणाने जेठालाल आणि अय्यरमध्ये चांगलीच भांडणे होणार आहे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन होणार आहे. 

Also Read : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दयाबेनची शाहरुख खानने घेतली काळजी
Web Title: Iyer and Jethalal in a series of reverse chakra in Tarak Mehta's series will again get a fight
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.