It's a dream that the actor would have been an entertainment show, so much hard work taken for that | स्वत:चा एंटरटेंन्मेंट शो असावा असे स्वप्न होते या अभिनेत्याचे,यासाठी घेतली इतकी मेहनत

चैतू लाल या भ्रष्ट राजकीय नेत्याच्या जीवनावर आधारित ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही ‘स्टार प्लस’वरील एक राजकीय विडंबनात्मक मालिका आहे.आपले राजकीय नेते सामान्य माणसाला कशी पोकळ आश्वासने देतात,त्याचे उपहासात्मक चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे.आजवर अनेक राजकीय विडंबन लेखन केलेले विनोदवीर राजीव निगम हे ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेद्वारे टीव्हीवर पुनरागमन करीत आहेत.या मालिकेबद्दल उत्सुक असलेला अभिनेता राजीव निगमने सांगितले की,“विविध रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांमध्ये मी ब-याच विनोदी भूमिका साकारल्या आहेत. त्याला आता बरीच वर्षं होतील.रसिक मला विचारत की इतर विनोदवीरांप्रमाणे मी माझी स्वत:ची विनोदी मालिका कधी सुरू करणार म्हणून या विनोदवीरांनी नॉन-फिक्शन क्षेत्रात आपल्या मालिका तयार केल्या असल्याने मी काल्पनिक क्षेत्रात मालिका निर्माण करण्याचा निर्णय घेतला.आता मी माझी स्वत:ची मालिका घेऊन टीव्हीवर येत आहे,हे सांगण्याचा माझा प्रयत्न असून रसिक माझ्या मालिकेवर प्रेम करतील अशी आशा आहे.” राजकीय विडंबनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले राजीव निगम हे या मालिकेद्वारे प्रेक्षकांची प्रशंसा मिळविण्यास उत्सुक झाले आहेत.ही नर्म विनोदी मालिका त्यांना नक्कीच गुदगुल्या करणार यात शंका नाही.

राजीवने आतापर्यंत अनेक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांमध्ये भाग घेतला असून त्याने अनेक राजकीय उपहासात्मक लेखनही केले आहे. तो ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत एका भ्रष्ट नेत्याची भूमिका रंगविणार असून त्यात त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबियांवर झोत टाकण्यात आला आहे.‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही एक अगदीच वेगळ्या प्रकारची विनोदी मालिका आहे. त्यात भ्रष्ट आणि विनोदी राजकीय नेत्याची कथा सांगितली आहे. या मालिकेत ज्येष्ठ विनोदी अभिनेता अश्विनी धीर याच्या सहकार्याने राजकीय परिस्थितीवर विनोदी टिप्पणी अपेक्षित आहे. सामान्य माणसाला भेडसावणार्‍या अडचणी आणि संकटांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या मालिकेत त्यावर तिरकस झोत टाकण्यात आला आहे.या मालिकेचे स्वरूप आणि संकल्पना लक्षात घेता तिच्या प्रोमोंचा प्रारंभ केंद्रीय अर्थसंकल्पावरील भाष्याने करण्यात आला.
Web Title: It's a dream that the actor would have been an entertainment show, so much hard work taken for that
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.