Its confirmed: 'Sun Surma Me Sanj Piya ji' will take a series of festivals, discussions of the Seven-Season | Its confirmed:'तू सूरज मैं सांज पिया जी' मालिका घेणार रसिकांचा निरोप,तीस-या सिझनची रंगते चर्चा

‘तू सूरज मैं सांज पिया जी’ या नावाने ‘दिया और बाती हम’ या मालिकेचा सिक्वेल गेल्याच वर्षी रसिकांच्या भेटीला आला होता.नव्या सीझनमध्ये मालिकेची कथा निसर्गसुंदर अशा केरळ बॅकड्रॉपवर आधारित होती.मात्र जितकी पसंती मालिकेच्या पहिल्या भागाला म्हणजेच 'दिया और बाती हम' मालिकेला मिळाली.पाहिजे तितकी पसंती सिक्वेलला मिळाली नाही. दिया और बाती मालिकेतले कलाकारांनीही याच मालिकेने प्रकाशझोतात आणले घराघरातल्या प्रत्येकाला ते आपल्यातलेच एक वाटले होते.मात्र नवीन सिझनच्या कथेला रसिकांनी जास्त पसंती दिली नाही.त्यामुळे मालिकाही टीआरपी रेटींगमध्ये अव्वल नसल्याचे पाहायला मिळाले.अशा अनेक कारणांमुळे अखेर निर्मात्यांनी ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळतेय.तसेच मालिका बंद होण्यापूर्वीच तिस-या सिझनची चर्चा जोर धरू लागली आहे.


cnxoldfiles/a>रसिकांना दीपिका आणि अनसची ही जोडी चांगलीच भावली. राजस्थानच्या बॅकड्रॉपवर रंगणा-या 'दिया और बाती' मालिकेने रेटिंगमध्येही सातत्य ठेवलं होतं. त्यामुळे छोट्या पडद्यावरील हिट मालिका म्हणून या मालिकेची गणना होऊ लागली.  2016 मध्ये 'दिया और बाती' या मालिकेने रसिकांचा निरोप घेतला. यांत सूरज आणि संध्याचा मृत्यू दाखवण्यात आला होता. मालिकेने छोट्या पडद्यावरुन अचानक एक्झिट घेतल्याने रसिकांमध्ये काहीशी नाराजी होती. मात्र काही दिवसांतच मालिका परत सुरु होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानुसार ‘तू सूरज मैं सांज पिया जी’ या 'दिया और बाती हम' या मालिकेच्या सिक्वेलच्या घोषणेमुळे रसिकांची प्रतीक्षा संपली  होती.तसेच सध्या सिक्वेलचा जमाना असल्यामुळे पुन्हा मालिकेच्या टीमने तिसरा सिझन आणण्याची तयारी केली असल्याचे कळतंय.तिस-या सिझनमध्ये कोणते कलाकार झळकणार याची लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे कळतंय.
Web Title: Its confirmed: 'Sun Surma Me Sanj Piya ji' will take a series of festivals, discussions of the Seven-Season
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.