It will be seen in the role of humor in the mythological series | संपदा वझे या पौराणिक मालिकेत मंदोदरीच्या भूमिकेत झळकणार

अनेक पौराणिक शो मध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या संपदा वझे आता कलर्सची पौराणिक मालिका कर्मफलदाता शनि मध्ये लवकरच दिसणार आहे.या अभिनेत्रीने नुकतेच तिच्या या शो मधील चित्रीकरणाला सुरूवात केली आहे आणि शोच्या निष्णात कलाकारांमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे.संपदा रावणाच्या पत्नीची आत्मनिष्ठ मंदादरीची भूमिका साकारणार आहेत.मंदोदरी ही रावणाची कर्तव्यतत्पर बायको असते जी अतिशयसुंदर तर असतेच शिवाय सद्गुणी आणि धार्मिक वृत्तीची असते.तिला रावणापासून मेघनाद,अतिकेय आणि अक्षय कुमार अशी तीन मुले झालेली असतात. तथापि, रावण जेव्हा धामिनीला पकडतो आणि तिच्याशी लग्न करू इच्छितो,तेव्हा लंके मधून पळून जाण्यात धामिनीला मंदोदरी जसर्वात जास्त मदत करते.संपदा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बातमीला दुजोरा दिला आणि शो मध्ये सहभागी झाल्या बद्दलच्या भावना सांगताना त्या म्हणाल्या,''रावणाच्या बायकोची मंदोदरीची भूमिका रंगविण्यासाठी मला आनंद वाटतो आहे, तिचे नाव तर सर्वांनी ऐकले आहे पण कोणालाही तिच्या विषयी जास्त माहिती नाही.तिच्या जीवनातील परिस्थिती वेगळी असून सुध्दा ती योग्य मार्गावर चालण्याचा प्रयत्न करते आणि ती म्हणजे रावणासाठी अगदी योग्य कोंदण आहे, रावणाची भूमिका साकारली आहे धाबाज खान यांनी. कलर्स आणि टीम स्वस्तिक यांच्या सोबत माझी ही दुसरी वेळ आहे नवकाळ नंतर आणि मला आशा आहे की लंकेची दुर्दैवी राणी मंदोदरीच्या विविध छटा साकारण्यात मला यश येईल''.


Also Read:म्हणून जुही परमार,तस्निम शेख,आकाशदीप सेहगल या कलाकरांनी छोट्या पडद्यावर केले कमबॅक

प्रत्येक कलाकाराला एकदा तरी त्याच्या करिअरमध्ये छोटा पडद्यावर झळकण्याची इच्छा असते. कारण मालिका विश्वामुळे हे सेलिब्रेटी घरघरात पोहचतात आणि रसिकांना आपलेसे करतात. एकाच मालिकेतून 5 ते 6 वर्ष रसिकांचे मनोरंजन करता करता रसिकांचे आणि कलाकरांचे एक अतुट असे बंध निर्माण होतात.त्यामुळे काही वर्ष अभिनयापासून ब्रेक घेतलेल्या  कलाकरांना पुन्हा एकदा छोटा पडदा खुनावू लागतो. त्यामुळे ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा अनेक चेहरे कर्मफलदाता मालिकेत वेगवेगळ्या भूमिकेत झळकले आहेत.
Web Title: It will be seen in the role of humor in the mythological series
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.