It took me a while that Ajit's name in the series ie Nitish Chavan was not supposed to be acting but in this field. | ​लागिरं झालं जी या मालिकेतील अज्या म्हणजेच नितिश चव्हाणला अभिनय नव्हे तर या क्षेत्रात करायचे होते करियर

छोट्या पडद्यावर सध्या लागीरं झालं जी ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेचं दिवसेंदिवस रंजक होत चाललेलं कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. फौजींच्या जीवनावरील आधारित या मालिकेत अज्या म्हणजेच अजिंक्य आणि शीतली अर्थात शीतलची लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळाली असून त्या दोघांचे नुकतेच लग्न झाल्याचे देखील दाखवण्यात आले आहे. अजिंक्य आणि शीतल रसिकांच्या घराघरात लोकप्रिय झाले आहेत. शीतल ही भूमिका अभिनेत्री शिवानी बोरकर हिने साकारली आहे. तर अजिंक्यची भूमिका नितीश चव्हाण याने साकारली आहे. मालिकेत अजिंक्य लष्करात दाखल झालेला असल्याचे नुकतेच मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाले. एखाद्या खऱ्या खुऱ्या फौजीला त्याच्या खऱ्या आयुष्यात जी मेहनत करावी लागते तशीच मेहनत नितिश आपल्या फिटनेसवर घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. कपाळावर चंद्रकोर, आकर्षक शरीरयष्टी यामुळे अजिंक्यचा ऑनस्क्रीन लूक रसिकांमध्ये विशेषतः तरुणींमध्ये हिट ठरत आहे.
नितिश चव्हाण या मालिकेमुळे प्रेक्षकांचा लाडका झाला असला तरी नितिशला अभिनयक्षेत्रात करियर करण्याची इच्छा नव्हती. त्याला एका वेगळ्याच क्षेत्रात करियर करून त्या क्षेत्रात आपले नाव कमवायचे होते. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी सांगितले आहे. तो सांगतो, मी एक खूप चांगला डान्सर असून याच क्षेत्रात मला नाव कमवायचे होते. डान्सिंग या माझ्या पॅशनला माझे करियर बनवायचे होते. पण अचानक मला लागिरं झालं जी या मालिकेतील ऑडिशन विषयी कळले. मी अनेक एकांकिकांमध्ये काम केले आहे. त्यामुळे ऑडिशन द्यावे असा सहज विचार केला आणि या मालिकेसाठी माझी निवड देखील झाली. 
27 वर्षीय नितीशचा जन्म साताऱ्यात झाला आहे. दापोलीत प्राथमिक शिक्षण, वाईमध्ये उच्चशिक्षण आणि पुढील शिक्षण त्याने पुण्यात पूर्ण केले. नृत्याची त्याला सुरुवातीपासूनच आवड होती. जेननेक्स्ट नावाची त्याने डान्स अकादमीही सुरू केली होती. अभिनयासोबतच नितीश डान्सिंगमुळेही लोकप्रिय आहे.  

Also Read : लागीरं झालं जी या मालिकेत शीतलची भूमिका साकारणाऱ्या शिवानी बावकरला या मालिकेसाठी मिळते इतके मानधन
Web Title: It took me a while that Ajit's name in the series ie Nitish Chavan was not supposed to be acting but in this field.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.