It is revealed that Mohit Rana has done his and Moni Roy's relationship | ​मोहित रैनाने त्याच्या आणि मॉनी रॉयच्या नात्याबद्दल केला हा खुलासा

मोहित रॉय आणि मॉनी रॉय यांनी देवो के देव महादेव या मालिकेत काम केले होते. त्या मालिकेमधील त्या दोघांच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. त्या दोघांच्या केमिस्ट्रीची देखील चांगलीच चर्चा झाली होती. ही मालिका संपल्यानंतर मोहित आणि मॉनीला अनेक वेळा पुरस्कार सोहळ्यात, पार्टीत एकत्र पाहायला मिळाले. तसेच मोहित आणि मॉनी हे दोघेही इन्स्टाग्रामवरील त्यांच्या अकाऊंटवर त्यांचे एकत्र फोटो शेअर करत असतात. त्यामुळे त्या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याच्या बातम्या नेहमीच ऐकायला मिळतात. पण मॉनी आणि मोहित यांनी नेहमीच यावर मौन राखणेच पसंत केले आहे.
मोहितने नुकतेच त्याच्या आणि मॉनी रॉयच्या नात्याबद्दल एक प्रतिक्रिया दिली आहे. मॉनी ही केवळ त्याची खूप चांगली मैत्रीण असल्याचे त्याने म्हटले आहे. मोहितने म्हटले आहे की, मी नेहमीच माझे वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्य यामध्ये ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करतो. मी आज अनेक वर्षं इंडस्ट्रीत असलो तरी मॉनी हीच केवळ माझी इंडस्ट्रीमधील सगळ्यात चांगली मैत्रीण आहे. माझ्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर मी केवळ माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबतच फोटो पोस्ट करतो. त्यामुळे माझ्या अनेक फोटोंमध्ये मॉनी असते. त्यामुळेच मॉनी आणि माझे फोटो पाहून आमच्या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी असल्याची चर्चा नेहमीच रंगते. देवो के देव महादेव या मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी आम्ही दोघे खूप चांगले फ्रेंड्स बनलो. आजही आमच्या दोघांची मैत्री तितकीच घट्ट आहे. आम्ही दोघांनी देखील स्वतःच्या मेहनतीवर अभिनयक्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. आम्ही दोघेही छोट्या शहरातून आलेलो आहोत. तसेच कोणीही गॉड फादर नसताना यश मिळवले आहे. यांसारख्या अनेक गोष्टी आमच्या आयुष्यात सारख्या असल्याने आम्ही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनलो. 
मॉनी रॉय प्रेक्षकांना लवकरच गोल्ड चित्रपटात अक्षय कुमार सोबत पाहायला मिळणार असून मोहित डिस्कव्हरी जीतवरील २१ सरफरोशः सरगारी १८९७ या मालिकेत झळकणार आहे. 

Also Read : मौनी रॉयने वाहिली मधुबालाला श्रद्धांजली
Web Title: It is revealed that Mohit Rana has done his and Moni Roy's relationship
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.