It is a matter of those days that Fame Randeep Raiyar's time to ride the autorickshaw | यह उन दिनों की बात है फेम रणदीप रायवर का आली रिक्षा चालवण्याची वेळ

मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात प्रवास करणे सोपे काम नाही. मुंबईतील ट्रफिकमध्ये तुमचे दिवसातील अनेक तास जातात. या ट्रॅफिकमध्ये इतर वाहनांच्या तुलनेत रिक्षा अगदी निमुळत्या जागेतून निघू शकतात. रहदारीतून मार्ग काढू शकतात आणि स्वस्त देखील असतात. काळी आणि पिवळी दिसणारी ही तीन चाकी रिक्षा मुंबई शहराचे एक लक्षणीय अंग आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘यह उन दिनों की बात है’ मालिकेत समीरची भूमिका साकारणार्‍या रणदीप रायने अलीकडे सेटवर रिक्षा चालवण्याचा प्रयत्न केला. 
यह उन दिनों की बात है च्या निर्मात्यांनी नव्वदच्या दशकाचे उत्कृष्ट चित्रण सादर करून प्रेक्षकांना त्यांच्या भूतकाळातील गोड आठवणीत गुंतविले आहे. समीर (रणदीप राय) आणि नैना (आशी सिंह) यांचे शालेय जीवन दाखवल्यानंतर आता या मालिकेत प्रेक्षकांना त्यांचा कॉलेज रोमान्स पाहायला मिळणार आहे. कॉलेजमधील दृश्याचे चित्रीकरण करताना आणि सेटवरील बदल सुरू असताना रणदीप आणि त्याच्या सह-कलाकारांना थोडा मोकळा वेळ मिळाला आणि त्यावेळी रणदीपने मुन्ना (संजय) आणि पंडित (राघव) या आपल्या दोस्तांना रिक्षातून एक फेरी मारून आणण्याचे ठरवले. त्यांची ही राईड खूपच छान झाली. याविषयी रणदीप राय सांगतो, “कॉलेज जीवनातील कथानकाचे चित्रीकरण आम्ही अलीकडेच सुरू केले आहे. नुकताच आम्हाला सेटवर थोडा मोकळा वेळ मिळाला. एका विशेष दृश्यासाठी प्रॉडक्शन टीमने एक रिक्षा सेटवर मागवली होती. मी चालकाच्या सीटवर बसलो आणि मुन्ना, पंडित यांना मागे बसण्यास सांगितले आणि फिल्म सिटीभोवती एक छोटी फेरी आम्ही मारली. आम्हाला तिघांना सेटवर जेव्हाही वेळ मिळतो, तेव्हा आम्हाला असा वेडेपणा करायला आवडतो. आम्ही फोटो आणि व्हिडिओ काढून आमच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर आमच्या चाहत्यांसाठी पोस्ट देखील करत असतो. कॉलेज जीवनाचे चित्रीकरण करण्यास खूप मजा येत आहे. मी जणू पुन्हा कॉलेजमध्ये गेल्यासारखे मला वाटत आहे. मला कॉलेज जीवनाचे ते सुंदर दिवस पुन्हा जगण्याची संधी दिल्याबद्दल या मालिकेचे मी आभार मानतो.”

Also Read : ‘यह उन दिनों की बात है’ या मालिकेत गुड्डी मारुती साकारणार ही भूमिका
Web Title: It is a matter of those days that Fame Randeep Raiyar's time to ride the autorickshaw
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.