Innovated Surprises | अभिनवने दिले सरप्राईज

शक्ती अस्तित्व के एहसास की या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी रुबिनाचा नुकताच वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसाची सरप्राईज पार्टी तिचा प्रियकर अभिनव शुक्लाने आयोजित केली होती. त्याने तिचे घर बलून आणि रिबिनने सजवले होते. तसेच तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींनाही त्याने पार्टीला बोलावले होते. या सरप्राईजमुळे रुबिना खूपच खूश झाली. ती सांगते, "मला अभिनवने खूप चांगले सरप्राईज दिले. त्याने माझ्यासाठी पार्टी आयोजित केली होती. तसेच त्याने स्वतःच्या हाताने दिवा असे लिहिलेला टी-शर्टदेखील मला गिफ्ट म्हणून दिला. त्याने मला सरप्राईज देण्यासाठी खूपच जास्त मेहनत घेतली." 
 

Web Title: Innovated Surprises
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.