'Industry does not have any hard work' - Namish Taneja | ‘इंडस्ट्रीत मेहनतीला पर्याय नाही’ - नमिष तनेजा

अबोली कुलकर्णी

स्टार प्लस वाहिनीवरील ‘इक्यावन’ या हिंदी मालिकेतून अभिनेता नमिष तनेजा प्रेक्षकांच्या  भेटीला आला आहे. विविध अवॉर्ड शोज आणि प्रसिद्ध शोजमधून रसिकांना भेटणारा नमिष आता या नव्या मालिकेत सत्या या व्यक्तिरेखेत दिसतो आहे. त्याच्या मालिकेबद्दलच्या आणि आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी मारलेल्या या गप्पा...

* ‘इक्यावन्न’ या हिंदी मालिकेत तू सत्या या व्यक्तिरेखेत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहेस. काय सांगशील तुझ्या व्यक्तिरेखेविषयी?
- मी या मालिकेत सत्या हे कॅरेक्टर साकारत आहे. हे कॅरेक्टर प्रेक्षकांना खूप जवळचे वाटते. विशेष म्हणजे सत्याचा स्वभाव एकदम हटके आहे. तो सर्वांना आनंदी ठेवू इच्छितो. मस्तीखोर, सगळयांना एंटरटेन करणारा त्याचा स्वभाव आहे. थोडक्यात काय तर, छोटया पडद्यावरचा सलमान खान म्हणून सत्याचे कॅरेक्टर प्रेक्षकांना आवडत आहे.

*  प्राची तेहलानसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
- खरं सांगायचं तर, प्राची तेहलान ही दिल्लीची राहणारी आहे. मी देखील मुळचा दिल्लीचाच. त्यामुळे आमचे विचार, आमचं बोलणं सगळं एकमेकांसारखंच आहे. मला असं वाटतं की, आम्ही दोघे लहानपणीचे मित्र आहोत. या मालिकेच्या निमित्ताने आमची भेट झाली. प्राचीचा स्वभावही खूप चांगला आहे. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला आहे.

* सत्या आणि नमिषमध्ये काय साम्य आहे? सत्याकडून तुला काय शिकायला मिळाले?
- माझं कॅरेक्टर सत्या आणि माझ्यामध्ये खूप फरक आहे. मी सत्यासारखा बिल्कुल नाही. सत्या खूपच मस्तीखोर, एंटरटेन करणाऱ्या  अशा स्वभावाचा आहे. त्याउलट मी. खूपच शांत, कमी बोलणारा, स्वत:च्या कामातच व्यस्त राहणारा असा मी आहे. 

* अवॉर्ड मिळाल्यामुळे खरंच एखाद्या अभिनेत्याच्या अभिनयाचे मुल्यमापन करता येते का? तसेच प्रेक्षकांनी दिलेली कौतुकाची थाप किती महत्त्वाची असते? 
- मला असं वाटतं की, एक अवॉर्ड अभिनेत्याच्या अभिनयाचे मुल्यमापन करू शकत नाही. कारण इंडस्ट्रीत बऱ्याच गोष्टी ठरलेल्या असतात. कलाकाराच्या मागे असलेली फॅनफॉलोर्इंग, मालिकेचा टीआरपी या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. तसेच प्रेक्षकांनी दिलेली कौतुकाची थाप ही कलाकाराला प्रोत्साहन देणारी असते. त्यामुळे एक कलाकार नेहमीच त्याच्या इच्छित ध्येय गाठू शकतो.

* सध्या अनेक टीव्ही कलाकार बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत. तुला संधी मिळाल्यास करायला आवडेल का?
- नक्कीच. मला आवडेल. इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याअगोदर प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते की, आपण बॉलिवूडमध्ये काम करावे. खरं सांगायचं तर, मी ‘इक्यावन’ मालिकेच्या शूटिंगला सुरूवात करण्याअगोदर मला एक फोन आला होता. एका चित्रपटासाठीच मला विचारण्यात येत होते. पण, तेव्हा मी मालिकेसाठीची शुटिंग सुरू केली होती. त्यामुळे मी चित्रपटाला नकार कळवला. पण, नक्कीच काही दिवसांत मी एखाद्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याचा प्रयत्न क रीन. 

* वेबसीरिज हा एक नवा पर्याय इंडस्ट्रीला मिळाला आहे. तुला संधी मिळाली तर करायला आवडेल का? तसेच या नव्या पर्यायाविषयी काय वाटते? 
- नक्कीच मला वेबसीरिजमध्ये काम करायला आवडेल. वेबसीरिज भारतात आत्ता आले आहे, परदेशात तर वेबसीरिज हा प्रकार खूप गाजतो आहे. वेबसीरिज बनवायला बराच कालावधी मिळतो. त्यामुळे तयार झालेल्या एपिसोड्सची क्वालिटी चांगली होते. 
Web Title: 'Industry does not have any hard work' - Namish Taneja
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.