If you open the bells open, then you will receive a new series of receptions | ​खुलता कळी खुलेना घेणार निरोप,तर ही नवी मालिका येणार रसिकांच्या भेटीला

छोट्या पडद्यावर सध्या नवनवीन मालिका रसिकांच्या भेटीला येत आहे. जुन्या मालिका रसिकांचा निरोप घेऊन तिथे नवीन मालिकांची एंट्री होत आहे. गेल्या काही दिवसांत छोट्या पडद्यावर अनेक नवनवीन मालिका रसिकांच्या भेटीला आल्या आहेत. यांत जाडूबाई जोरात, गाव गाता गजाली या मालिकांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. आता छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका रसिकांचा निरोप घेणार आहे. मोनिका-विक्रांत आणि मानसी या तीन व्यक्तीरेखांभोवती या मालिकेचे कथानक फिरत होते. अल्पावधीतच या मालिकेने रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली. या मालिकेच्या कथेसोबतच त्याचं शीर्षकगीतसुद्धा हिट झालं होतं. हे शीर्षकगीत जितकं श्रवणीय तितकेच ते बघावसंही वाटत होतं. या मालिकेने गेल्या महिन्यातच वर्षपूर्तीचं सेलिब्रेशन केले होते. मात्र आता खुलता कळी खुलेना मालिकेच्या फॅन्सचा हिरमोड करणारी बातमी आहे. कारण ही मालिका आता लवकरच निरोप घेण्याची शक्यता आहे. या मालिकेच्या जागी आता एक नवी कोरी मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.नुकतेच त्याचे प्रोमोसुद्धा झळकू लागले आहेत.'तुझं माझं ब्रेक-अप' नावाची नवी मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.प्रोमोनुसार ही तुझ माझं ब्रेक-अप ही मालिका 18 सप्टेंबरपासून रसिकांच्या भेटीला येणार आहे.या मालिकेला प्राईम टाईमची म्हणजेच रात्री साडेआठची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच सध्या या वेळेत सुरु असलेली खुलता कळी खुलेना ही मालिका रसिकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तुझं माझं ब्रेक-अप या शीर्षकावरुनच या मालिकेचं कथा तरुणाईभोवती फिरणारं असल्याचं बोललं जातंय. तसंच या मालिकेच्या कथेचा गाभा हा प्रेम असेल असंच दिसतंय. त्यामुळे आता खुलता कळी खुलेना या मालिकेला निरोप देत रसिकांना तुझं माझं ब्रेक-अपची उत्सुकता लागली असणार.
Web Title: If you open the bells open, then you will receive a new series of receptions
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.