Ice cream party was set on a double, frost, lake set of my favorite series! | दुहेरी,गोठ,लेक माझी लाडकी मालिकांच्या सेटवर झाली आईस्क्रीम पार्टी!

 पावसाळा तसा रोमँटीक ऋतू प्रत्येकजण आपापल्या रितीने पावसाची मजा घेतात.त्यात छोटा पडद्यावरचे कलाकार तरी कसे मागे राहतील. ब-याचदा भजी पार्टी करत पावसाचा मनमुराद आनंद लुटताना कलाकार दिसतात. मात्र काही मालिकांच्या कलाकरांनी भजी पार्टी नाहीतर चक्क आईस्क्रीम पार्टी करत आईस्क्रीमवर ताव मारताना दिसतायेत.भर पावसात कुल्फी किंवा आईस्क्रीम खाणं म्हणजे क्रेझी अनुभव असतो. हाच क्रेझी अनुभव घेतला  कुटुंबातील सदस्यांनी... वर्ल्ड आईस्क्रीम डे निंमित्त स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांतील कलाकारांनी मालिकेच्या सेटवर मनसोक्त आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. जगभरात नुकताच वर्ल्ड आईस्क्रीम डे साजरा केला गेला.या निमित्ताने स्टार प्रवाहच्या 'गोठ','लेक माझी लाडकी', 'दुहेरी', 'नकुशी' या मालिकांच्या सेटवर उत्साहानं आईस्क्रीम सप्ताह साजरा करण्यात आला. अगदी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, नीलकांती पाटेकर यांच्यापासून ते ऐश्वर्या नारकर,अविनाश नारकर, आशुतोष कुलकर्णी, विकास पाटील, सायली देवधर, संकेत पाठक, सुपर्णा श्याम, समीर परांजपे, रुपल नंद, प्रसिद्धी किशोर,सुप्रिया विनोद, सुशील इनामदार, विवेक गोरे, शलाका पवार, नीलपरी खानवलकर, सिद्धेश्वर झाडबुके, सिद्धेश प्रभाकर, अमृता पवार, आदी कलाकार आईस्क्रीम खाण्यात पुढे होते. या सर्वांनी कुल्फी, कँडीवर ताव मारला.'आईस्क्रीम सप्ताह ही संकल्पनाच फार कमाल आहे.पाऊस पडत असताना आईस्क्रीम खाणं जरा विचित्र वाटलं, तरी त्यातही एक वेगळी गंमत आहे. या आईस्क्रीम सप्ताहच्या निमित्तानं ही गंमत आम्हालाही अनुभवता आली याचा आनंद वाटतो,' असं गोठ या मालिकेतील लोकप्रिय जोडी 'विरा' अर्थात, समीर परांजपे आणि रुपल नंद यांनी सांगितलं.Web Title: Ice cream party was set on a double, frost, lake set of my favorite series!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.