‘कृष्णा चली लंडन' मालिकेतील कृष्णाला खऱ्या आयुष्यात हवाय असा Dream Boy

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 06:30 AM2018-12-27T06:30:00+5:302018-12-27T06:30:00+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेतील नायक-नायिकेतील प्रेमाच्या नात्याने रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे.

I wish I could find a husband like Radhey: Megha Chakraborty | ‘कृष्णा चली लंडन' मालिकेतील कृष्णाला खऱ्या आयुष्यात हवाय असा Dream Boy

‘कृष्णा चली लंडन' मालिकेतील कृष्णाला खऱ्या आयुष्यात हवाय असा Dream Boy

googlenewsNext
ठळक मुद्दे राधेसारखा पती मिळावा अशी आता प्रत्येक तरुणीची इच्छा आहेराधेच्या या कृतीमुळे मेघा चांगलीच भारावून गेली आहे

‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेतील नायक-नायिकेतील प्रेमाच्या नात्याने रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपली पत्नी कृष्णा हिचे लंडनला जाऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पू्र्ण करण्यासाठी राधे तिला घेऊन लंडनला आला आहे. राधेसारखा पती मिळावा अशी आता प्रत्येक तरुणीची इच्छा आहे या लिस्टमध्ये चक्क या मालिकेतील कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या मेघा चक्रबोर्तीचा देखील समावेश आहे.   

राधेबद्दल मेघा म्हणाली, “कृष्णावर अत्यंत प्रेम करणारा आणि तिलाच आपलं आयुष्य वाहिलेला राधे तिचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न तो पूर्ण करतो. तो तिच्याबरोबर लंडनला येतो आणि तिच्या जीवनाच्या या नव्या टप्प्यात तिला कोणतीही कमी पडणार नाही, याची तो खबरदारी घेतो. तो कृष्णाच्या मागे खंबीरपणे उभा राहतो आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. मलाही खऱ्या जीवनात राधेसारखाच नवरा मिळावा, असं वाटतं कारण कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला मदत करणारा असा पती लाभणं हे दुर्मिळ आहे. राधेने सर्वच नवऱ्यांसाठी नवा मापदंड निर्माण केला असून त्याच्यासारखाच पती लाभावा अशी इच्छा आता प्रत्येक मुलगी करते आहे.” 

राधेच्या या कृतीमुळे मेघा चांगलीच भारावून गेली आहे. आता राधेच्या अथक प्रयत्नांमुळे आणि भक्कम पाठिंब्यामुळे लंडनला जाऊन डॉक्टर होण्याचे कृष्णाचे स्वप्न लवकरच साकार होताना दिसेल. राधेचे कृष्णावर किती प्रेम असते आणि लंडनमधील तिचे वास्तव्य सुखकर होण्यासाठी तो किती धडपड करतो, ते लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Web Title: I wish I could find a husband like Radhey: Megha Chakraborty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.