I was away from the owners because I was telling Rajiv Paul | ​राजीव पॉल सांगतोय या कारणांनी मी मालिकांपासून दूर होतो

राजीव पॉलने कहानी घर घर की, अभिमान, यस बॉस यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तो आता ‘जीजी माँ’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही वर्षांपासून तो छोट्या पडद्यापासून दूर होता. आता तो या मालिकेद्वारे कमबॅक करत आहे. त्याच्या या कमबॅकबाबत तो खूपच उत्सुक आहे. तो त्याच्या सेकंड इनिंगला सुरुवात करत असल्याचे त्याला वाटत आहे. राजीव छोट्या पडद्यापासून दूर राहाण्यामागे एक खास कारण होते. तो गेल्या नऊ वर्षांपासून लिलेट दुबेबरोबर वेडिंग अल्बम हे नाटक करत आहे. तसच टीव्हीवर परतण्यासाठी तो एका चांगल्या भूमिकेच्या शोधात होता आणि त्यातही त्याच्या आयुष्यात घडलेल्या घडामोडींमुळे तो तणावात होता. याविषयी राजीव सांगतो, गेल्यावर्षी २६ डिसेंबर २०१६ला माझे वडील कर्नल जोगेंद्रसिंह पॉल वारले. तेव्हापासून दोन-तीन महिने मी मुंबईत नव्हतो. या मालिकेसाठी मला मार्चमध्ये निर्मात्यांचा फोन आला. दोनच वर्षांपूर्वी माझ्या आईचे कॅन्सरने निधन झाले आणि आता वडिलांचे निधन झाले. त्यामुळे मी खूपच वाईट मनस्थितीत होतो. त्यामुळे मी कोणतेही काम काही दिवस करायचे नाही असे ठरवले होते. पण निर्मात्यांनी मला भेटायला बोलावले असल्याने मी त्यांना जाऊन भेटलो. या भूमिकेसाठी मीच योग्य असल्याचे त्यांचे म्हणणे असल्याने मी या मालिकेचे भाग बनलो. या मालिकेत मी एका गर्भश्रीमंत व्यक्तीची भूमिका साकारत आहे. अतिशय श्रीमंत असल्याने त्याचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे. कोणत्याही गोष्टीमुळे तो अस्वस्थ होत नाही की चिडचिड करत नाही. तो आपले काम कसे होईल, याकडे लक्ष देतो. तो आपल्या प्रकृतीची तसेच त्याच्या कुटुंबियांचीही खूप काळजी घेतो. समाजाचे भले व्हावे, यासाठी तो काही स्वयंसेवी संस्थांनाही मदत करतो. 
या मालिकेशिवाय राजीव पॉलच्या दोन पुस्तकांचे लवकरच प्रकाशन करणार आहे. या पुस्तकांपैकी एक इंग्रजी काल्पनिक कादंबरी आहे. तसेच आधीच्या मोहब्बत और तनहाई या हिंदी कवितासंग्रहाचा दुसरा भाग देखील वाचकांच्या भेटीस येणार आहे. 

Also Read : म्हणून ‘जीजी माँ’मालिकेच्या टीमने शिर्डीला जाऊन घेतले साईबाबांचे आशिर्वाद!
Web Title: I was away from the owners because I was telling Rajiv Paul
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.