I like to laugh at myself - Akshay Kumar | मला स्वत:वर हसायला आवडते - अक्षय कुमार

‘सौगंध’ या चित्रपटातून अक्षय कुमारने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र त्याला खरी ओळख मिळवून दिली ती  खिलाडी चित्रपटाने. या चित्रपटानंतर तो बॉलिवूडचा खिलाडी कुमारच झाला. अक्षय आतपर्यंतच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये चौकटी बाहेरच्या भूमिका साकारल्या आहेत. एअरलिफ्ट, रुस्तम, बेबी असे एकापेक्षा एक हिट चित्रपट अक्षयने बॉलिवूडला दिले.गेल्या 5 वर्षात त्यांने बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या करिअरचा ग्राफ हा सतत्याने वरच गेला आहे. आता तो 'ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या कॉमेडी शोमध्ये तो सुपर जजच्या भूमिकेत दिसणार आहे. याचसंदर्भात त्याच्याशी साधलेला दिलखुलास संवाद.      लिफ्ट
 

तुझी या शोमध्ये कोणत्या भूमिकेत दिसणार आहेस ?
हा एक कॉमेडी शो आहे. या शोमध्ये आम्ही संपूर्ण भारतातून स्टँड कॉमेडियन्स बोलवतो. त्यांना 3 ते 4 मिनिटांत त्यांची कला सादर करण्याची संधी देण्यात येते.  त्या चार मिनिटांत त्यांना आम्हाला हसवायचे असते. कारण भारताला हसण्याची सध्या फार गरज असल्याचे मला वाटते आहे. कारण रोज आपण वर्तमानपत्रात नेगेटीव्ह बातम्या वाचतो त्यामुळे एक पोजिटीव्ह वातावरणाची आपल्याला खूप गरज आहे. तसेच आपल्या दिवसाची सुरुवात जर एखाद्या चांगल्या जोक्सने झाली तर उर्वरित दिवस ही आपला खूप चांगला जातो. भारतीच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक यात  प्रेक्षकांना हसवण्यासाठी एकत्र आले आहेत याचा मला खूप आनंद आहे. एक गोष्टीचा उल्लेख याठिकाणी मला अवर्जुन करावासा वाटतो तो म्हणजे सतत हसत राहिल्यामुळे माझे रक्त वाढले आहे. 'ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'मध्ये सुपरजजच्या खुर्चीत बसून कॉमेडीचा आनंद घेणे मी एन्जॉय करतो आहे. 

तू  तुझ्या करिअरमध्ये आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेस, करिअरच्या या टप्प्यावर तू आजही एक्सपिरिमेंट करायला एक्साईटेड असतोस का ?
मी आजही ही शरीराबरोबर मनाने ही तरुण आहे. मला आजही असेच वाटते की मी आयशा झुलकासोबत खिलाडीची शूटिंग दोन आठवड्या पूर्वीच केली आहे. मी आता ही पुन्हा खिलाडीची शूटिंग करायला तयार आहे. मला वयाचे बंधन कधीच वाटत नाही. तो फक्त तुमच्या मनाचा खेळ असतो असे मी म्हणेन.  

विनोदाची तुझी व्यख्या काय आहे ?
मी जेव्हा कॉमेडी करतो तेव्ही ती मी स्वता: वर करतो. चार्ली चॅप्लिन नेहमी स्वत:वर कॉमेडी करायचे. केळ्याच्या सालीवरुन ते पडायचे आणि आपल्याला हसवायचे. काही कॉमेडीन्स मला माहिती आहे जे इतरांवर जोक्स करुन कॉमेडी करतात. हा त्यांचा अंदाज आहे. मी हे नाही म्हणत की तो चुकीचा आहे. जो तो आपल्या जागी बरोबर असतो. मी मात्र कॉमेडी करताना ती नेहमीच स्वत:वर करतो. 

सध्या इंडस्ट्रीत अनेक स्टार किड्सचा डेब्यू सुरु आहे. तुझा मुलगा ही चित्रपटात दिसणार का ?
 माझा मुलगा अजून लहान आहे. तो फक्त आता 15 वर्षांच्या आहे.  त्याच्यावर कोणत्याही प्रकारची चित्रपटात येण्यासाठी जबरदस्ती नाही आहे.  मी माझ्या मुलाला सांगितले आहे की, त्याला चित्रपटात जरी यायचे असेल तरी त्याने स्वत: हुन जाऊन निर्मात्याला अॅप्रोच करावा आणि चित्रपट तयार करावा. 
Web Title: I like to laugh at myself - Akshay Kumar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.