'I am not a true crime master gogo' For the first time Shakti Kapoor confessed | 'मी खरा क्राईम मास्‍टर गोगो नाही' पहिल्यांदाच जाहीरित्या शक्ती कपूरने दिली कबुली

बॉलिवूडमध्‍ये खलनायकाची भूमिका नेहमीच प्रशंसनीय राहिली आहे आणि या कॅरेक्टरने चित्रपटाला नाट्यमय वळण देण्‍यामध्‍ये महत्‍त्‍वाची भूमिका बजावली आहे. काही आयकॉनिक खलनायकांचे व्‍यक्तिमत्‍त्‍व आणि भूमिका आपल्‍या मनात खोलवर रुजलेल्‍या आहेत.'कितने आदमी थे?' किंवा 'मोगॅम्‍बो खुश हुआ!' यांसारखे संवाद आजदेखील लोकांच्‍या मनावर प्रभाव टाकतात. 

&TV वरील शो 'हाय फिव्‍हर डान्‍स का नया तेवर'मध्‍ये दोन लोकप्रिय खलनायक आले होते. बॉलिवुडमध्‍ये 'बॅड मॅन' म्‍हणून ओळखले जाणारे गुलशन ग्रोव्‍हर हे वयाच्‍या ६२व्‍या वर्षी देखील खलनायकाची त्‍यांची उत्‍तम शैली सादर करतात.ते या शोमध्ये अतिथी म्‍हणून आले होते.त्‍यांच्‍यासोबत होते चित्रपटसृष्‍टीमधील सर्वात लोकप्रिय खलनायक 'क्राईम मास्‍टर गोगो' ऊर्फ शक्‍ती कपूर, ज्‍यांनी आपल्या अनोख्या भूमिकेने आणि विनोदी संवादांसह परीक्षक व स्‍पर्धकांना मनोरंजन केले आहे. या खलनायकांचा सन्‍मान करण्‍यासाठी एपिसोडमध्ये स्पर्धक जोड्यांनी आपल्‍या उत्‍तम नृत्‍य सादरीकरणांच्‍या माध्‍यमातून त्‍यांची क्रूर बाजू सादर केली. क्राईम मास्‍टर गोगो भूमिकेबाबत बोलताना आणि 'अंदाज अपना अपना' चित्रपटातील सुप्रसिद्ध सीन सादर करण्‍यासाठी विचारले असता शक्‍ती कपूर यांनी अनेकांना माहीत नसलेले गुपित उघड केले परीक्षक व प्रेक्षकांना अचंबित करत शक्‍ती कपूर म्‍हणाले, ''मी खरा क्राईम मास्‍टर गोगो नाही. ही भूमिका टिनू आनंद साकारणार होता, जो या भूमिकेसाठी योग्‍य होता. पण त्‍याला काही कारणास्‍तव परदेशी जावे लागले आणि दिग्‍दर्शक या रोचक भूमिकेसाठी माझ्याकडे आले. मी टिनूला कॉल केला आणि ही भूमिका साकारण्‍यासाठी त्‍याची परवानगी घेतली. टिनूने चित्रपटासाठी अत्‍यंत प्रसिद्ध संवाद लिहिला होता, जो दिग्‍दर्शकाने घेतला. तो संवाद होता 'आँखें निकालके गोटी खेलूंगा!''' खलनायकाच्‍या भूमिकेमध्‍ये सामावून जात शक्‍ती कपूर गोगोच्‍या भूमिकेमध्‍ये गेले आणि आपल्‍या दृष्‍ट स्‍टाइलमध्‍ये म्‍हणाले, ''अगर मेरे पास बंदूक होती, तो में गोली मार देता.'' त्‍यांनी चित्रपटातील सर्वात संस्‍मरणीय व विनोदी सीन देखील सादर केला. हा सीन पाहून सर्व प्रेक्षक हसून हसून लोटपोट झाले होते. 
Web Title: 'I am not a true crime master gogo' For the first time Shakti Kapoor confessed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.