बने संमेलनात झाले ‘ह.म.बने तु.म.बने’च्या व्यक्तिरेखांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 10:34 AM2019-02-14T10:34:28+5:302019-02-14T10:35:12+5:30

एक दिवसीय कौटुंबिक ‘बने संमेलन’ दादर येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात बने कुटुंबिय मोठ्या संख्येने सामिल झाली होती.

Hum Bane Tum Bane Serial actor attended Bane Function | बने संमेलनात झाले ‘ह.म.बने तु.म.बने’च्या व्यक्तिरेखांचे कौतुक

बने संमेलनात झाले ‘ह.म.बने तु.म.बने’च्या व्यक्तिरेखांचे कौतुक

googlenewsNext

कौटुंबिक विरंगुळा आणि मनोरंजन म्हणून अनेक ठिकाणी सदस्यांतर्फे सदस्यांसाठी संमेलन आयोजित केले जाते ज्यामध्ये दैनंदिन आयुष्यातील सर्व काही ताण-तणाव, तसेच कामे बाजूला सारुन काही दिवस स्वत:च्या सुखासाठी, आनंदासाठी हक्काने दिला जातो. स्पर्धा, धमाल-मस्ती-मज्जा, खेळ यांसारख्या अनेक गोष्टी या मनोरंजक संमेलनात मोडतात. अशाच पद्धतीचे एक दिवसीय कौटुंबिक ‘बने संमेलन’ दादर येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात बने कुटुंबिय मोठ्या संख्येने सामिल झाली होती.

आपल्या भोवताली ‘बने’ असे कोणाचे आडनाव जरी उच्चारले गेले तरी लगेच ‘ह.म.बने तु.म.बने’च्या कुटुंबाची आठवण अनेकांना येते. ही मालिका आणि बने कुटुंब प्रेक्षकांना आपलीशी वाटतेय, म्हणूनच तर दादर येथील बने संमेलनात बने कम्युनिटीच्या वतीने ‘ह.म.बने तु.म.बने’ मालिकेतील बने कुटुंबाला आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते. प्रेक्षकांचे प्रेम आणि आपुलकी पाहता सोनी मराठीवरील बने कुटुंब या संमेलनात स्वखुशीने आणि उत्साहाने उपस्थित देखील राहिले होते.
‘ह.म.बने तु.म.बने’ ही हलकी-फुलकी, मनोरंजक मालिका प्रेक्षकांची फेव्हरेट मालिका बनली आहे आणि या मालिकेत गंभीर विषयांवर हसतमुखाने केलेले भाष्य किंवा एपिसोड हे प्रेक्षकांना जास्त भावतं. त्यामुळे बने कुटुंब आणि त्यातील प्रत्येक सदस्य हा आपल्यातलाच एक आहे असं त्यांना वाटतं. प्रश्न-उत्तरं, क्विज, काही घरगुती खेळ या संमेलनात खेळले गेले आणि या संमेलनाचे कौटुंबिक स्वरुप असल्यामुळे प्रत्येकांनी यामधील खेळांचा आनंद लुटला. राणी गुणाजी आणि अदिती सारंगधर या कशा आदर्श सूना वाटतात आणि आई-बायकोची भूमिका किती सुंदर निभावतात
असे अनेकांनी त्यांचे कौतुक केले. इतकेच नव्हे तर आजी-आजोबा हवे तर बने यांच्यासारखेच असं देखील अनेकांनी यावेळी म्हटले. मुळात काय तर, एकत्र कुटुंब आनंदीही राहू शकतं आणि एकमेकांच्या सुख-दु:खात सामिलही होऊ शकते हा संदेश मालिकेतून जसा दरवेळी दिला जातो, त्याचेच तोंडभरुन कौतुक सर्व उपस्थित बने कुटुंबांनी ‘बने संमेलनात’ केले.
 

Web Title: Hum Bane Tum Bane Serial actor attended Bane Function

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.