Hrithan Khan's Big Boss House Drama Queen Gifted! | रुसलेल्या मित्राची बिग बॉसच्या घरातील ड्रामा क्वीन हिना खानने घेतली भेट!

कलर्स या वाहिनीवरील बिग बॉसचा सीजन ११ संपून आता बराच कालावधी झाला. परंतु अशातही या सीजनमधील स्पर्धक सातत्याने माध्यमांमध्ये झळकत आहेत. कुठल्या ना कुठल्या कारणांनी त्यांची चर्चा रंगत असल्याने ते आजही प्रसिद्धीझोतात आहेत. असो, लव त्यागी आणि हिना खान यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी सांगणार आहोत. शोमध्ये चांगले मित्र बनलेल्या या दोघांनी एकमेकांच्या संपर्कात राहणे टाळले. वास्तविक शोमधील बरेचसे स्पर्धक शोनंतरही एकमेकांना भेटताना आणि हॅँगआउट करताना बघावयास मिळाले. परंतु लव आणि हिना चांगले मित्र असूनही आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. त्याचबरोबर दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचीही चर्चा रंगली. यास कारण हिना असल्याचेही बोलले जात होते. परंतु आता हिनाने आपल्या रुसलेल्या मित्राची भेट घेऊन त्याचा रुसवा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. बºयाच काळानंतर लव त्यागीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून, त्यामध्ये तो हिनासोबत दिसत आहे. फोटोमध्ये हिना कॅज्युअल ड्रेसमध्ये बघावयास मिळत आहे. तर लव खूपच हॅण्डसम दिसत आहे. हा फोटो शेअर करताना लवने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अखेर या अद्भुत मुलीशी भेट झाली. त्याचबरोबर त्याने ‘मिस यू लॉट’ असेही लिहिले. दरम्यान, बिग बॉसच्या घरात लव, हिना आणि प्रियांक शर्मा यांच्यात खूप चांगली मैत्री झाली होती. परंतु शोबाहेर पडताच त्यांच्या मैत्रीत दरार निर्माण झाली. तिघांनी शोच्या फिनालेमध्ये एकत्र परफॉर्मन्स दिला होता. काही दिवसांपूर्वीच शोची विजेती शिल्पा शिंदे दिल्लीत गेली होती. यावेळी शिल्पाला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी लव त्यागी त्याठिकाणी पोहोचला होता. दोघांच्या भेटीचे त्याने काही फोटोही शेअर केले होते. दरम्यान, बिग बॉसच्या घरात चांगले मित्र बनलेले लव त्यागी आणि हिना खान घराबाहेर पडताच एकमेकांपासून दूर झाले. त्यांच्यात वाद असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. त्यातच एका मुलाखतीत जेव्हा हिनाने, लव त्यागीच्या कानाखाली माराविशी वाटते, असे म्हटले होते तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता. हिनाने आपल्या मुलाखतीत म्हटले होते की, शो संपल्यानंतर आम्ही सर्वांनी एकमेकांच्या भेटी घेतल्या. मी लव यालादेखील फोन केला होता. परंतु त्याने मला म्हटले होते की, मी आता एका कॉमनरप्रमाणे राहू इच्छितो. त्यामुळे मी त्याच्यावर खूप नाराज आहे. मला त्याच्या कानाखाली माराविशी वाटत आहे. 

परंतु ज्यापद्धतीने लव आणि हिना यांची भेट घडून आली त्यावरून दोघांमधील मैत्री पुन्हा एकदा बहरण्याची शक्यता आहे. दोघांमध्ये पूर्वीसारखेच नातेसंबंध निर्माण होतील, अशी त्यांच्या चाहत्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
Web Title: Hrithan Khan's Big Boss House Drama Queen Gifted!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.