How much has changed in 'Shaktiman' 'Guita Believer', it is difficult to identify these incidents now! | किती बदलली 'शक्तीमान'मधील'गीता विश्वास',आता या अवतारात ओळखणेही झाले कठीण!

नव्वदच्या दशकात छोट्या पडद्यावर विविध मालिकांनी रसिकांची मनं जिंकली. आजही या मालिका रसिकांच्या मनात घर करुन आहेत. याच अनेक लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे शक्तीमान. भारताचा पहिला सुपरहिरो असलेला शक्तीमान बच्चेकंपनीसह सा-यांनाच भावला. प्रत्येक सुपरहिरोची प्रेयसी नसेल असं होईल का? अगदी त्यानुसारच मालिकेतही शक्तीमानचीही एक प्रेयसी होती. शक्तीमान ज्या तरुणीवर प्रेम करायचा ती एक रिपोर्टर होती आणि तिचं नाव गीता विश्वास असं होतं.शक्तीमान मालिकेतील भूमिकेमुळे अभिनेता मुकेश खन्ना यांना जितकी लोकप्रियता आणि प्रेम मिळालं तितकंच रसिकांचं प्रेम गीता विश्वास ही भूमिका साकारणारी अभिनेत्री वैष्णवी महंत हिलाही मिळालं. शक्तीमान, गंगाधार आणि गीता विश्वास या व्यक्तीरेखांनी रसिकांवर जादू केली.त्यामुळे नव्वदच्या दशकात या मालिकेने लोकप्रियतेचे सर्वोच्च शिखर गाठलं होतं.कधी कुणी शक्तीमानच्या रुपात दिसायचं तर कुणी गंगाधर तर कुणी गीता विश्वासच्या रुपात दिसायचं अशी क्रेझ या मालिकेची सर्वसामान्यांवर पाहायला मिळत होती.शक्तीमान मालिकेला आता बरीच वर्षे लोटली आहेत.शक्तीमान साकारणा-या मुकेश खन्ना यांचंही वाढलेलं वय त्यांच्या केस आणि चेह-यावरुन सहज लक्षात येते.तसेच काहीसे गीता विश्वास साकारणा-या वैष्णवी महंतबाबतही घडतंय.विनामेकअप वैष्णवीला आता ओळखणेही कठीण झाले आहे.खुद्द वैष्णवीनेच तिचा हा सेल्फी फोटो तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर केला आहे. फोटो शेअर करताच तिला अनेक चाहत्यांच्या कमेंटही आल्या आहेत.रिअल लाईफ फोटोपाहून वैष्णवीचे चाहते मात्र तिचा विनामेकअप फोटो पाहून आश्चर्यचकीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.काही दिवसांपूर्वी वैष्णवी महंतचे एक फोटोशूट समोर आले होते. या फोटोशूटमध्ये तिचा बोल्ड, हॉट आणि सेक्सी अंदाज पाहायला मिळाला.गीताचे (वैष्णवी)चे हे फोटो पाहून छोट्या पडद्यावरील गंगाधरसुद्धा चक्रावून गेला नसता तरच नवल अशा कमेंटस तिला तिच्या चाहत्यांकडून मिळाल्या होत्या.सध्या वैष्णवीचा फोटो 'जे दिसतं तंस नसतं'अशीच चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. 
 
शक्तीमान या मालिकेनंतर वैष्णवीने विविध मालिकांमध्ये काम केलंय.'मिले जब हम तुम','सपने सुहाने लडकपन के','टशन-ए-इश्क' या मालिकांमधील वैष्णवीच्या भूमिकांची चर्चा झाली.1988 पासून विविध मालिका आणि सिनेमात तिने काम केले आहे.'बंबई के बाबू' या सिनेमातही तिने आपल्या अभिनयासह सौंदर्याची जादू दाखवली होती.याशिवाय लाडला सिनेमातही तिने भूमिका साकारली होती. 
Web Title: How much has changed in 'Shaktiman' 'Guita Believer', it is difficult to identify these incidents now!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.