How do you think the 'Mami' of the series 'Lajar ja ji'? Leave a comment below | 'लागीर झालं जी' मालिकेतील अजिंक्यच्या ‘मामी’चा हा अंदाज तुम्हाला कसा वाटला? खाली कमेंट देऊन कळवा

छोट्या पडद्यावर सध्या लागीर झालं जी ही मालिका रसिकांचं तुफान मनोरंजन करत आहे. या मालिकेचं कथानक रसिकांना भावतंय.फौजीच्या जीवनावर आधारित या मालिकेत दिवसेंदिवस येणारे ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले आहेत.दिवसागणिक फुलत जाणारी अजिंक्य आणि शीतलची प्रेमकहानी रसिकांची मनं जिंकण्यात आणि खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र रसिकांना आपलंसं वाटू लागलंय. मालिकेतील प्रत्येक पात्राची वेगळी खासियत आहे. मग तो राहुल्या असो किंवा मग भैय्या, जम्या असो किंवा टॅलेंट, मामा असो किंवा मामी प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करुन आहे. या प्रत्येकाची बोलण्याची स्टाईल रसिकांना आकर्षित करते. या मालिकेत सध्या अज्या आणि शीतली यांच्या लव्हस्टोरीची रसिकांना उत्सुकता आहे.तसंच अजिंक्य त्याचं फौजी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यापासून एक पाऊल दूर आहे. मात्र त्याच्या या स्वप्नात अडथळा निर्माण करत आहे ती त्याची मामी. या मालिकेत मामी अजिंक्यचं स्वप्न पूर्ण होऊ नये यासाठी विविध कट आखते. अजिंक्य फौजी बनू नये आणि आपल्या लेकीसह त्याचे लग्न व्हावे यासाठी कितीही कट फसले तरी नवनवीन युक्त्या मामी लढवत असते. त्यामुळे दिवसेंदिवस अजिंक्यच्या आयुष्यात संकटं येत आहेत. हा कपटी स्वभावच सध्या छोट्या पडद्यावरील रसिकांच्या मनात मामीबद्दल तिरस्कार निर्माण करत आहे. या मामींना रसिक मनोमनी शिव्याही घालत असणार. अस्सल गावरान बोलणं आणि त्याहून अधिक कपटी वागणं यामुळे या मामी या व्यक्तीरेखेनं मालिकेत वेगळे स्थान मिळवलं आहे. रिल मामी पाहून तुम्हाला राग येत असला तरी तिचा रिअल अंदाज पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसणार नाही. मालिकेत अज्याची खाष्ट आणि कपटी मामी हीच आहे असा प्रश्न पडावा असा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कपाळावर कायम आठ्या,तिरसट बोलणं-वागणं आणि कटकारस्थान रचणारी हीच का मामी असा प्रश्न तुम्हाला हा फोटो पाहून तुम्हाला नक्कीच पडेल. अज्याच्या मामीच्या भूमिका साकारणा-या मामीचा हा रिअल फोटो सध्या रसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. मालिकेत साडीत वावरणा-या मामी या फोटोमध्ये जीन्स, टॉपवर मस्त बिनधास्त मूडमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. यांत त्यांच्या चेह-यावर कसलाही राग नसून स्मित हास्य पाहायला मिळतंय. या भूमिकेबाबत रसिकांमध्ये राग असला तरी तिच त्यांच्या कामाची पोचपावती आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये. रिल लाइफमध्ये गावरान आणि कपटी वाटत असल्या तरी रिअल लाइफमध्ये बिनधास्त आणि आधुनिक विचाराच्या आहेत. हीच बाब या फोटोवरुन स्पष्ट दिसत आहे. तुम्हाला कसा वाटला मामींचा हा रिअल रॉकिंग अंदाज ?

Also Read:‘लागीरं झालं जी’ फेम 'अज्या'चा हा डॅशिंग अवतार तुम्ही पाहिलाय का?

Web Title: How do you think the 'Mami' of the series 'Lajar ja ji'? Leave a comment below
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.