Hotness Alert! Karisma Sharma's New Pratap, This Photo Due to Viral | Hotness Alert !करिश्मा शर्माचा नवीन प्रताप,या फोटोमुळे झाली व्हायरल

बॉलिवूड सेलिब्रेटी असो किंवा मग टीव्ही सेलिब्रेटी स्वतःला मनोरंजन आणि झगमगाटाच्या दुनियेत चमकण्यासाठी नको त्या गोष्टी करताना दिसतात.  मग ते बोल्डनेस असो किंवा वादग्रस्त विधानं. अशा काही गोष्टी केल्या की चर्चा तर होणारच हे समीकरण पक्कच आहे.  काही करून प्रसिद्धी मिळवून बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. आतापर्यंत केवळ आपल्या बोल्ड लूकने कायम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणा-या अनेक अभिनेत्रींची उदाहरणं आपल्याला माहिती आहे.आता याच यादीत आणखीन एका सेलिब्रेटींचे नाव मोडले गेले आहे. तिने  बोल्ड फोटोशूट शेअर करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'ये हैं मोहब्बते' या मालिकेत आणि एकता कपूरच्या 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' या वेब सीरिजमध्ये झळकलेली अभिनेत्री करिश्मा शर्मा सध्या याच बोल्ड आणि सेक्सी फोटोमुळे जास्त चर्चेत आली आहे. तिच्या या हाफ नेक्ड फोटोशूटमुळे तिला अनेकांना संमिश्र प्रतिक्रीयाही दिल्याचे पाहायला मिळत आहे.या फोटोशूटमध्ये अतिशय बोल्ड पोज दिल्याचे पाहायला मिळत आहे.या फोटोशूटमध्ये करिश्माने तिचे शरीर केवळ एका बँकेटने झाकले आहे. त्यामुळे अशा प्रकारचे फोटोशूट करून पब्लिसिटी कमावण्याचा फंडा करिश्माने हे फोटोशूट करून स्पष्ट केल्याचे पाहायला मिळत आहे.बोल्ड फोटो पोस्ट केल्यामुळे तुम्ही चर्चेत येतात असे आता अभिनेत्रींना वाटत असल्याने त्या चर्चेत येण्यासाठी सध्या हा मार्ग अवलंबत आहेत असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. काही दिवसांपूर्वीच ईशा गुप्ता तिच्या फोटोंमुळे चांगलीच फेमस झाली होती.इन्स्टाग्रामवर स्वत:चे टॉपलेस फोटो अपलोड करून इशा गुप्ता ट्रोलिंगचीही बळी ठरली होती.पण या ट्रोलिंगने इशाला काहीही फरक पडला नाही.उलट स्वत:चे त्याहीपेक्षाअतिशय बोल्ड फोटो पोस्ट करून इशाने ट्रोल करणा-याना खरमरीत उत्तर दिले होते.त्यानंतर अभिनेत्री मंदना करिमीने देखील हाच मार्ग अवलंबवला होता.तिने देखील टॉपलेस फोटोशूट केले होते.फोटोशूटमध्ये मंदनाचा देखील खूपच जास्त बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता.इतकेच नव्हे तर तासाभरात ४० हजारांवर लोकांनी हे फोटो लाईक केले होते.

Also Read: ‘टॉपलेस’ झाली इशा गुप्ता ; ट्रोल करणा-यांना ‘नो एन्ट्री’!! 
Web Title: Hotness Alert! Karisma Sharma's New Pratap, This Photo Due to Viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.