The horrific events that took place during the filming of the series 'Doom of Night' | ​‘कयामत की रात’ या मालिकेच्या सेटवर चित्रीकरणादरम्यान घडली ही भयानक घटना

एकता कपूरने अलीकडे अमानवी शक्तींवरील विषयावरील मालिकांच्या निर्मितीचा सपाटा लावला आहे आणि आता एकता कपूरनिर्मित ‘कयामत की रात’ नावाची नवी मालिका लवकरच ‘स्टार प्लस’वरून प्रसारित होणार आहे. आपल्या मालिकेच्या कथानकाच्या चित्रीकरणासाठी नवनवी स्थळे शोधण्यासाठी एकता प्रसिद्ध आहे. तिची ही नवी मालिकाही त्यास अपवाद नाही.
‘कयामत की रात’ या मालिकेच्या सेटवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मालिकेचे चित्रीकरण भारतातील सर्व भागांमध्ये केले जाणार आहे. उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम अशा देशाच्या विविध भागांमध्ये हे चित्रीकरण केल जाईल. मालिकेसाठी सुयोग्य स्थळाचा शोध घेताना मालिकेची टीम कोलकात्याच्या अलीपोर भागातील नॅशनल लायब्ररी येथे पोहोचली. या ऐतिहासिक शहरात मालिकेच्या टीमने बरीच मजा केली आणि या शहरातील अनेक जुन्या इमारती आणि वास्तूमुळे त्यांना आपल्या मालिकेच्या पटकथेसाठी उत्कृष्ट पार्श्वभूमीही मिळाली. अर्थात या मालिकेच्या भयसूचक कथानकानुसार, प्रत्यक्ष चित्रीकरणादरम्यानही एक थरारक अनुभव आला. नॅशनल लायब्ररीत चित्रीकरण सुरू असताना काही तांत्रिक कारणामुळे सर्व दिवे बंद झाले आणि तिथे गुडुप अंधार झाला. त्यामुळे तेथील वातावरण काहीसे भयमय झाले होते. “आम्ही आजवर भूताखेतांच्या बऱ्याच कथा ऐकल्यामुळे तिथे अंधार झाल्यावर सर्वांच्या मनात भीतीने धडधडी भरली होती.” असे मालिकेच्या टीममधील मंडळींनी सांगितले.
ससुराल सिमर का या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली दीपिका कक्कर कयामत की रात या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक करत असून आजवर तिने साकारलेल्या भूमिकांपेक्षा या मालिकेतील तिची भूमिका खूपच वेगळी आहे. त्यामुळे ती या मालिकेत काम करण्यास खूप उत्सुक आहे. या मालिकेत दीपिका एका नवपरिणित वधूच्या भूमिकेत दिसणार असून तिचा या मालिकेतील लूक अगदी वेगळा असणार आहे.
कयामत की रात या मालिकेत दीपिकासोबतच विवेक दहिया आणि करिश्मा तन्ना यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या मालिकेचे मूळ शीर्षक शैतान असे होते. पण एकता कपूरच्या सांगण्यावरून या मालिकेच्या शीर्षकात अचानक बदल करण्यात आला.

Also Read : ​एकता कपूरने या कारणामुळे अचानक बदलले मालिकेचे नाव

Web Title: The horrific events that took place during the filming of the series 'Doom of Night'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.