मिका सिंगची छोट्या पडद्यावर सुरेल होळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 09:00 PM2019-03-18T21:00:00+5:302019-03-18T21:00:00+5:30

संगीत आणि नृत्याने सर्व समारंभ छान साजरे केले जातात. होळीच्या सणाचा हा उत्साह आणि ऊर्जा पुढे चालू ठेवत कलर्सवरील लोकप्रिय शो गठबंधन मध्ये सावित्री माईने (सोनाली नाईक) योजित केलेल्या मोठ्या पार्टीत हा समारंभ साजरा केला जाणार आहे.

Holi on Mika singh's small screen | मिका सिंगची छोट्या पडद्यावर सुरेल होळी

मिका सिंगची छोट्या पडद्यावर सुरेल होळी

googlenewsNext

संगीत आणि नृत्याने सर्व समारंभ छान साजरे केले जातात. होळीच्या सणाचा हा उत्साह आणि ऊर्जा पुढे चालू ठेवत कलर्सवरील लोकप्रिय शो गठबंधन मध्ये सावित्री माईने (सोनाली नाईक) योजित केलेल्या मोठ्या पार्टीत हा समारंभ साजरा केला जाणार आहे.

या समारंभात, प्रेक्षकांना मीका सिंग या निष्णात गायकाला पाहून आनंद होणार आहे, तो त्याच्या विशेष कामगिरीने शो वरील कलाकारां सोबत मंच उजळवून टाकणार आहे. सावित्री माईच्या (सोनाली नाईक) खास आमंत्रणा वरून मीका सिंग पाहुणा म्हणून आलेला शो मध्ये दिसणार आहे. सावित्री माई त्याची जबरदस्त चाहती आहे पडद्यावरील आणि वास्तविक जीवनातही.


पार्टीचा शोस्टॉपर बनलेला मीका सावन में लग गयी आग, दिल में बजे गिटार आणि आँख मारे ही प्रसिद्ध गाणी म्हणणार आहे. या त्याच्या कामगिरी सोबतच प्रेक्षकांना मीका कामदेवाचा खेळ खेळताना दिसणार आहे आणि रघू (अब्रार काझी) आणि धनक (श्रुती शर्मा) यांना एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तो रघूला धनकला त्याच्याकडे ओढण्यासाठी काही विशेष युक्त्या सांगून मदत करणार आहे.
कलर्स सोबतच्या या सहभागा विषयी बोलताना, मिका सिंग म्हणाला, “कलर्स सोबतच्या सहभागातून मला नेहमीच चांगला अनुभव मिळालेला आहे. हा माझा पहिलाच फिक्शन शो आहे आणि गठबंधनमध्ये कलाकारांसोबत होळी साजरा करण्याची मला उत्कंठा आहे. मला होळी या सणाची एक गोष्ट आवडते आणि ती म्हणजे त्यात सामाजिक अंतर कमी होते आणि काहीही बंधने न घालता सर्वजण एकत्र येतात. संगीताच्या शक्तीने मी दोन मने एकत्र आणणार आहे.”
 

Web Title: Holi on Mika singh's small screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.