नच बलिये या कार्यक्रमात भाग घेण्याविषयी हिना खानने केला हा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 09:00 PM2019-03-10T21:00:00+5:302019-03-10T21:00:02+5:30

नच बलिये या कार्यक्रमाच्या नवव्या सिझनमधील पहिली जोडी हिना खान आणि तिचा जोडीदार रॉकी जैयस्वाल असणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगली होती.

Hina Khan will not participate in Nach Baliye | नच बलिये या कार्यक्रमात भाग घेण्याविषयी हिना खानने केला हा खुलासा

नच बलिये या कार्यक्रमात भाग घेण्याविषयी हिना खानने केला हा खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्देहिना खान नच बलिये या कार्यक्रमाचा भाग नसणार असल्याचे तिने नुकतेच स्पष्ट केले आहे. हिना खान लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणात ती व्यग्र असल्याने तिला नच बलिये या कार्यक्रमासाठी वेळ देता येणार नाहीये.


‘स्टार प्लस’वरील सर्वात लोकप्रिय रिअ‍ॅलिटी कार्यक्रम ‘नच बलिये’ लवकरच टीव्हीच्या पडद्यावर पुन्हा झळकणार असून या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या कार्यक्रमाच्या प्रत्येक सिझनला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या कार्यक्रमात नेहमीच बॉलिवूड, टिव्ही आणि मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोड्या आपल्या नृत्याने प्रेक्षकांना प्रभावित करतात. या सिझनमध्ये देखील अनेक प्रसिद्ध जोड्या सहभागी होणार आहेत. प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्या आठवड्यांमागून आठवडे वेगवेगळे प्रकारची नृत्ये सादर करताना पाहून प्रेक्षकांचे भान हरपणार यात काहीच शंका नाही. 

‘नच बलिये’ या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून आता कोणते सेलिब्रेटी या कार्यक्रमाचा भाग असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. नच बलिये या कार्यक्रमाच्या नवव्या सिझनमधील पहिली जोडी हिना खान आणि तिचा जोडीदार रॉकी जैयस्वाल असणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगली होती. पण हिना खान नच बलिये या कार्यक्रमाचा भाग नसणार असल्याचे तिने नुकतेच स्पष्ट केले आहे. हिना खान लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणात ती व्यग्र असल्याने तिला नच बलिये या कार्यक्रमासाठी वेळ देता येणार नाहीये. त्यामुळे हिनाच्या फॅन्सची निराशा होणार यात काहीच शंका नाही. 

हिनाला स्टार प्लसवरीलच ये रिश्ता क्या कहलाता है या कार्यक्रमामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती बिग बॉस, खतरों के खिलाडी यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये झळकली होती. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत काम करत असताना हिना आणि रॉकी एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि नंतर रॉकीने टीव्हीवरच हिनाला लग्नाची मागणी घातली होती. सध्या ती कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिका ही खलनायकाची भूमिका रंगवत आहे. आपल्या मादक रूपाने तिने मालिकेत एक ग्लॅमर आणले आहे.

नच बलिये कार्यक्रमाचे आतापर्यंतचे आठ सिझन यशस्वीपणे पार पडले असून आता या कार्यक्रमाचा नववा सिझन लवकरच स्टार प्लसवर प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात टीव्हीवरील लोकप्रिय कलाकारांच्या जोड्या स्पर्धक म्हणून सहभागी होणार असून शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Hina Khan will not participate in Nach Baliye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.