Hina Khan did the work to break the image of 'Sanskar Bahu'? | 'संस्कारी बहू'ची इमेज तोडण्यासाठी हिना खानने केले हे काम?

गेले आठ वर्ष अक्षरा बनत हिना खानने रसिकांचे मनोरंजन केले.एकाच प्रकारचे साचेबद्ध कामात काहीतरी वेगळे करण्याची धडपड हिना करत होती.त्यामुळेच तिने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेला अलविदा केला.कुठेतरी 'संस्कारी बहु' अशी हिना खानची ओळख तिला नको होती. कलाकाराला कोणत्याही एकाच प्रकारच्या भूमिकेमुळे ओळखले जावू नये असे तिला वाटते.म्हणूनच तिने कामात वेगळेपण शोधण्यास सुरूवात केली होती.टीव्हीवरची तिची लोकप्रियता बघता तिला 'खतरों के खिलाडी 8' पर्वामध्ये कंटेस्टंट म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली.हिना खान पहिल्यांदाच या शोच्या माध्यमातून हटके आणि बिनधास्त दिसली.या शोमध्ये सेमी फायनलपर्यंत हिना पोहचली होती.त्यानंतर 'बिग बॉस 11' पर्वासाठी ऑफर मिळताच तिने ही संधी स्विकारली.यावेळीही फायनलपर्यंत हिना पोहचली मात्र विजेती बनण्यात अपयशी ठरली.आता तिला अनेक मालिकांच्या ऑफर्स येत आहेत.मात्र पुन्हा मालिका करण्यात तिला रस नसल्याचे तिने म्हटले आहे.आता कुठे इमेज ब्रेक करण्यात हिना यशस्वी ठरली आहे.त्यामुळे पुन्हा मालिका करण्यास तिने नकार दिला आहे.आता रिअॅलिटी शो बरोबरच तिला बॉलिवूडमध्येही एंट्री करण्याची इच्छा आहे. त्यामुळे आता बॉलिवूडचे तिकीट कधी मिळणार याकडेच हिनाचे लक्ष लागले आहे.


Also Read: Bigg Boss11:हिना खान आठवड्याला घेते एवढे लाख

बिग बॉस म्हटलं की घरात होणारे वादविवाद, अचानक फुलणारे प्रेमअंकुर असे अनेक गोष्टींमुळे हा शो रसिकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतो.'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत  अक्षरा म्हणून घराघरात पोहचलेली अभिनेत्री हिना खानची प्रचंड लोकप्रियता आहे.हिच लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी तिला बिग बॉसकडून ऑफर मिळाली. तसेच हिना खानला डेली सोपप्रमाणे रिअॅलिटी शोमध्येही तिचे वेगळेपण सिध्द करायचे आहे.त्यामुळे 'खतरों के खिलाडी 8'पर्व आणि आता 'बिग बॉस 11'मध्ये तिने एंट्री घेतली.मात्र हिना खानला बिग बॉसच्या घरात येण्यासाठी तगडी रक्कम मिळाल्याचेही चर्चा रंगल्या होत्या.हिनाला एका आठवड्यासाठी 7 ते 8 लाख रुपये मिळत असल्याच्या चर्चा आहे.तर हितेन तेजवानीला 7 ते 7.5 लाख रुपये मिळायचे.
Web Title: Hina Khan did the work to break the image of 'Sanskar Bahu'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.