हिमानी शिवपुरी आहेत 'या' दोन बॉलिवूड अभिनेत्यांच्या फॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 05:15 PM2019-03-12T17:15:25+5:302019-03-12T17:18:28+5:30

हिमानी शिवपुरी '&TV'वरील आपली नवी विनोदी मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'मध्ये नऊ खोडकर मुलांच्या आजीची भूमिका करत आहेत.

Himani Shivpuri a huge fan of ayushman khurana and vicky kaushal | हिमानी शिवपुरी आहेत 'या' दोन बॉलिवूड अभिनेत्यांच्या फॅन

हिमानी शिवपुरी आहेत 'या' दोन बॉलिवूड अभिनेत्यांच्या फॅन

googlenewsNext

आयुष्मान खुराणा आणि विकी यांनी गेल्या वर्षात आपल्या विलक्षण कामगिरीने आपले कौशल्य सिद्ध केले आहे आणि केवळ बॉक्स ऑफिसवर नव्हे तर आपल्या हृदयावरही राज्य केले आहे. महिलांमध्‍ये या दोन हॉटीजचा मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग आहे. आपल्या चित्रपटासाठी अ‍ॅवॉर्ड मिळणे किंवा प्रेक्षकांनी डोक्यावर घेणे हा वेगळं भाग आहे परंतु जेव्हा आपल्या कठोर परिश्रमासाठी आणि प्रतिभेसाठी ज्येष्ठ अनुभवी कलाकारांकडून कठोर परिश्रमांचे कौतुक केले जाते, तेव्हा काय होते? हिमानी शिवपुरी एक अनुभवी अभिनेत्री आहेत. त्‍यांच्‍या मते, आयुष्‍मान आणि विकीसारख्या नव्या पिढीचे अभिनेते मेगा-स्टारडमच्या धारणा बदलत आहेत आणि बॉलिवूड चित्रपटांत आपल्या सशक्त अभिनय कौशल्याने अधिराज्य गाजवत आहेत.  त्‍या रंगभूमीवरील एक दिग्‍गज व्‍यक्तिमत्‍व आहेत. सध्या शिवपुरी '&TV'वरील आपली नवी विनोदी मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'मध्ये नऊ खोडकर मुलांच्या आजीची भूमिका करत आहेत, जे पाहणे अतिशय मनोरंजनपूर्ण आहे. हिमानीने अभिनेता आयुष्‍मान व विकी यांची त्यांच्या अलीकडच्या हिट चित्रपटांच्या यशाबद्दल प्रशंसा केली आणि त्‍यांच्‍यासोबत काम करण्‍याची इच्‍छा देखील बोलून दाखवली.

अभिनेत्री म्हणते, ''आयुष्‍मान व विकी हे अत्यंत प्रतिभावान तरुण आहेत आणि मी त्यांच्या कामाची चाहती आहे. मी दोघांबरोबरही अ‍ॅड फिल्ममध्ये काम केले आहे आणि मला त्यांच्याबरोबर चित्रपटही करायला आवडेल. सध्या मी 'हप्‍पू की उलटन पलटन'साठी शूटिंग करण्यात व्यस्त आहे. मला आशा आहे की, नव्या पिढीच्या या दोन उत्‍तम कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळेल. 'एक गमतीशीर किस्सा आठवून ती सांगते, 'विकी आणि मी जेव्हा अ‍ॅड फिल्ममध्ये एकत्र काम करत होतो तेव्हा तो न थांबता सारखा सांगत होता की, तो माझा किती मोठा चाहता आहे. तेव्हा मी त्याला मध्येच थांबवून सांगितले की, उलट मीच तुझी मोठी प्रशंसक आहे आणि मला तुझ्यासोबत काम करायला आवडेल.''

Web Title: Himani Shivpuri a huge fan of ayushman khurana and vicky kaushal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.