थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो.कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे 'चला हवा येऊ द्या' हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे. कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. रसिकांना ते पोटधरुन हसवतात. मात्र या सगळ्या विनोदवीरांना एका धाग्यात पकडून ठेवणारा, त्यांच्याकडून अभिनय करवून घेणारा त्यांचा सूत्रधार आणि थुकरटवाडीचा कॅप्टन ऑफ शिप म्हणजे होस्ट डॉ. निलेश साबळे. 'चला हवा येऊ द्या' या शोची धुरा डॉ. निलेश साबळे यशस्वीरित्या सांभाळत आहे. शोचं लेखन, स्वरुप, दिग्दर्शन ही जबाबदारी निलेशने समर्थपणे पेलली आहे. थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर आपल्या कुटुंबीयांबाबत सोशल मीडियाच्या माध्यामातून काहीना काही शेअर करत असतात. मात्र डॉ. निलेश साबळेबाबत फारसं काही समोर आलेलं नाही. त्यामुळेच आम्ही तुम्हाला त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. डॉ. निलेश व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असून आयुर्वेद एम. एस. पदवीधर आहे. शालेय जीवनापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. विविध कलाकारांच्या नकला करण्यात पटाईत असल्याने कॉलेजमध्ये तो प्रसिद्ध होता. महाराष्ट्राचा सुपरस्टार हा रियालिटी शो जिंकत त्याने आपल्या अभिनय कारकीर्दीस सुरुवात केली. त्यानतंर 'होम मिनिस्टर' या मालिकेचे काही भागही त्याने केले. तसेच 'फु बाई फू' या कार्यक्रमामार्फत त्याला होस्ट बनण्याची संधी मिळाली. 'नवरा माझा भवरा' या सिनेमातही त्याने काम केलं. मात्र सिनेमात फारसं यश न मिळाल्याने तो पुन्हा सूत्रसंचालनाकडे वळला. आपलं लेखन, सूत्रसंचालन आणि विनोदवीरांच्या सोबतीने त्याने 'चला हवा येऊ द्या' शोला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. निलेश साबळेने २०११ साली पुण्याची मैत्रिण गौरीसोबत लग्न केलं. गौरी साबळे ह्या पदवीधर आहेत. अभिनय क्षेत्राचा आणि त्यांचा काहीही संबंध नसला तरी त्यांना मराठी नाटकं आणि मालिका पाहायला फार आवडतात. त्यांच्या लग्नाचे कधीही समोर न आलेले आणि फारसे कुणीही न पाहिलेले फोटो समोर आलेत. या फोटोंमध्ये डॉ. निलेश आणि गौरी मेड फॉर इच अदर असल्याचे पाहायला मिळत आहे. जन्मोजन्मीचे सोबती बनण्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.(Also Read:श्रेया बुगडे तिच्या पती निखीलने कसं केले प्रपोज, जाणून घ्या लव्हबर्ड्सची लव्हस्टोरी)

Web Title: Have you ever seen this photo of Dr. Nilesh Sable's wedding of Thukartwadi's master?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.