Happy Valentine's Day was given by Pasha Paras Fame Rishi Saxena in a special estimate given by Isha Kesar in Jai Malhar. | ​जय मल्हारमधील इशा केसकरने काहे दिया परदेस फेम ऋषी सक्सेनाला अशा खास अंदाजात दिल्या व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने इशा केसकरने एक छानसा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण या फोटोमध्ये तिच्यासोबत आपल्याला काहे दिया परदेस फेम ऋषी सक्सेनाला पाहायला मिळत आहे. या फोटोत त्या दोघांचा रोमँटिक अंदाज दिसून येत आहे. इशाने एका खास अंदाजात ऋषीला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हॅपी व्हॅलेंटाईन डे बेबी असे तिने लिहिले आहे. या तिच्या फोटोला तिच्या फॅन्सनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. इशाच्या या पोस्टला अनेकांनी लाइक केले असून अनेकांनी त्यावर भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. 
काहे दिया परदेस ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेत शिवची भूमिका ऋषी सक्सेना या अभिनेत्याने साकारली होती. ऋषी हा अमराठी असला तरी त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आज ही मालिका संपून काही महिने झाले असले तरी ऋषीने साकारलेली शिवची भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात आहे. शिवला त्याचे फॅन्स सध्या चांगलेच मिस करत आहेत.
ऋषी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सच्या संपर्कात राहातो. त्याच्या सोशल नेटवर्किंग साइटवर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. पण त्याने काही दिवसांपूर्वी इशा केसकर सोबत एक फोटो शेअर केला होता. या फोटोमुळेच त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती.  इशाने जय मल्हार या मालिकेत बानूची भूमिका साकारली होती. इशासोबतचा एक फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर ऋषीने पोस्ट केला होता. त्यासोबत लिहिलेल्या कॅप्शनमुळे त्या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा जास्त काही तरी असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्याने या फोटोसोबत इट्स बीन अ व्हाइल नाऊ असे लिहिले होते. या गोष्टीला बराच काळ झाला असा याचा अर्थ होतो.
ऋषी सक्सेना आणि इशा केसकर या दोघांनी देखील झी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये काम केले होते. त्यामुळे झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमांच्या दरम्यान या दोघांची भेट झाली. ते गेल्या काही महिन्यांपासून नात्यात असल्याचे म्हटले जात आहे. 

Also Read : 'काहे दिया परदेस'फेम ऋषी सक्सेनाही बॉलिवूडच्या वाटेवर?
Web Title: Happy Valentine's Day was given by Pasha Paras Fame Rishi Saxena in a special estimate given by Isha Kesar in Jai Malhar.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.