'Happy evening will be part of' Returns 'song,' Tu Saanjh, I shot by the artists of Piazi! | ‘हॅपी भाग जाएगी रिटर्न्स’च्या लोकेशनवरच ‘तू साँझ, मैं पियाजी’च्या कलाकारांनी केले चित्रीकरण!

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज तारे-तारका टीव्हीवरील अनेक कार्यक्रमांमधून आता दिसू लागले आहेत कारण टीव्ही हे आता छोटे,मर्यादित माध्यम राहिलेले नाही. टीव्हीचे माध्यम व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकते,ही गोष्ट लक्षात आल्यामुळे आजकाल आपल्या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी बहुसंख्य कलाकार टीव्हीवरच अवलंबून राहू लागले आहेत.हिंदी चित्रपटांइतक्याच टीव्हीवरील मालिकाही आता भव्य गणल्या जातात, हे सिध्द करण्यासाठी आणखी एक कारण मिळाले आहे.अलीकडेच ‘तू साँझ,मैं पियाजी’ मालिकेच्या आगामी कथाभागाच्या चित्रीकरणासाठी मालिकेतील कलाकार बँकॉकमध्ये गेले होते.त्यांनी तिथे ज्या स्थळांवर चित्रीकरण केले,त्याच स्थळांवर तत्पूर्वी सोनाक्षी सिन्हाच्या हॅपी भागद जाएगी रिटर्न्स या चित्रपटाचेही चित्रीकरण करण्यात आले होते. मालिकेच्या कलाकारांनी एकाच दिवसात दोन भागांमध्ये आपल्या मालिकेचे चित्रीकरण पूर्ण केले आणि नंतर एकत्र वेळ व्यतीत केला.अर्थात मालिकेतील काही प्रमुख कलाकार अधिक काळ चित्रीकरणात व्यग्र राहिल्याने त्यांना इतरांबरोबर मजा करता आली नाही, पण मालिकेच्या कर्मचा-यांनी मात्र तिथे खूप धमाल केली.टीव्ही आणि चित्रपट यांची एकमेकांत सरमिसळ कशी झाली आहे, त्याचेच हे अफलातून उदाहरण म्हटले पाहिजे.


Also Read:बँकॉकमध्ये कलाकारांचे जल्लोषात झाले स्वागत!

थायलंडमधील चाहते या कलाकारांच्या स्वागतासाठी उत्सुक होते आणि ते जेव्हा विमानतळावर आले,तेव्हा त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.8888विमानतळावर फुलांचे हार आणि फलकावर आपली छायाचित्र घेऊन आपल्या स्वागतासाठी आलेले शेकडो चाहते पाहून या मालिकेतील कलाकार आश्चर्यचकित झाले.या चाहत्यांचे हे प्रेम आणि उत्साह पाहून खुशीत आलेल्या या कलाकारांनी या चाहत्यांना आपल्या स्वाक्ष-या देऊ केल्या आणि त्यांच्याबरोबर छायाचित्रे काढली.मालिकेत कनकची भूमिका रंगविणारी रिहा शर्मा म्हणाली, “विमानतळावरच आमचं स्वागत करण्यासाठी आमचे अनेक चाहते आल्याचं पाहून आम्हाला आश्चर्यच वाटलं.आमच्या स्वागतासाठी त्यांनी फारच मेहनत घेतली होती आणि त्यामुळे आम्ही सर्वजण एकदम भारावून गेलो.'दिया और बाती हम' ही मालिका चांगलीच गाजली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय असल्यामुळे या मालिकेचा पुढचा भाग तू सूरज मैं साँझ पियाजी प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला. या मालिकेच्या कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय बनली आहे. या मालिकेत दिया और बाती हम या मालिकेतील काही कलाकार असून रिया शर्मा आणि अविनाश रेखी हे नवे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 
Web Title: 'Happy evening will be part of' Returns 'song,' Tu Saanjh, I shot by the artists of Piazi!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.