​सुयश टिळकने तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधरला दिल्या अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 05:09 AM2018-05-14T05:09:46+5:302018-05-14T10:39:46+5:30

नुकतेच अक्षया देवधरने आपला वाढदिवस सेलिब्रेट केला. तिला मराठी सिनेसृष्टीतील अनेकांनी शुभेच्छा दिल्या. मात्र इतक्या सगळ्या शुभेच्छांचा वर्षाव होत ...

Happy Birthday to Suvarna Tilak's Fame Akshaya Deodhar | ​सुयश टिळकने तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधरला दिल्या अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा

​सुयश टिळकने तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधरला दिल्या अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा

googlenewsNext
कतेच अक्षया देवधरने आपला वाढदिवस सेलिब्रेट केला. तिला मराठी सिनेसृष्टीतील अनेकांनी शुभेच्छा दिल्या. मात्र इतक्या सगळ्या शुभेच्छांचा वर्षाव होत असताना एका व्यक्तीचा मेसेज खास ठरला. शुभेच्छा देणारा होता बापमाणूस फेम सुयश टिळक... सुयश टिळक आणि अक्षया देवधर हे गेल्या कित्येक महिन्यांपासून नात्यात आहेत. ते त्यांच्या सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमीच त्यांचे फोटो शेअर करत असतात. अक्षयाचा वाढदिवस आणि त्यात सुयश शुभेच्छा देणार नाही असे होणारच नाही. त्यामुळे सुयशनेही अक्षयाच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर केला आणि त्याला छानशी कॅप्शनही दिली. या फोटोमध्ये सुयश आणि अक्षयाची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. लव्ह यू टू द मून अँड बॅक... हॅव अ हॅपिएस्ट बर्थडे... यावर साऱ्यांनीच आनंद व्यक्त करत अनेक नेटीझन्स लाईक्स आणि कमेंटस देताना दिसले. त्यामुळे पुन्हा एकदा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळाले.
सुयश आणि अक्षयाने एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाहीर कबुली आजवर कधीही दिलेली नाही. मात्र एकमेकांबद्दल असलेले प्रेमही ते जगापासून लपवून ठेवू शकले नाहीत. दोघांनीही त्याच्या नात्याबाबत नेहमीच मौन पाळणेच पसंत केले आहे. दोघांमधील प्रेमाच्या चर्चा वारंवार ऐकायला मिळतात. दोघांच्या अफेअरच्याच नाहीतर त्यांनी साखरपुडा केला असल्याचीही  खुमासदारपणे चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. दोघांनी गुपचूप साखरपुडा केला असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या. मात्र या बातम्या अगदी चुकीच्या असल्याचे सुयशने स्वतः सांगितले होते. 
तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे अक्षया देवधर ही घराघरात पोहोचली. तिने साकारलेली अंजलीबाईची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. आज प्रेक्षक तिला अंजली या नावानेच ओळखतात. अक्षयाने या आधी काही नाटकांमध्ये काम केले होते. तसेच सुजय डहाकेच्या शाळा या चित्रपटात देखील ती झळकली होती. पण तिची छोट्या पडद्यावर झळकण्याची ही पहिलीच वेळ असून तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. 

Also Read : स्त्री भूमिकेत कोण आहे हा मराठमोळा अभिनेता?

Web Title: Happy Birthday to Suvarna Tilak's Fame Akshaya Deodhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.