Happy Birthday, given by the reader, Boyfriend Suyashla, comments given by fans. | पाठकबाईंनी बॉयफ्रेंड सुयशला या शब्दात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,तर चाहत्यांनी दिल्या अशा कमेंट्स!

नुकतेच सुयशने आपला वाढदिवस सेलिब्रेट केला.त्याच्या मराठी सिनेसृष्टीतील अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या.मात्र इतक्या सगळ्या शुभेच्छांचा वर्षाव होत असताना एका व्यक्तीचा मेसेज खास ठरला.शुभेच्छा देणारी होती छोट्या पडद्यावरची राणा दाच्या पाठकबाई अंजलीबाई. सुयश टिळक आणि अक्षया देवधर हे गेल्या कित्येक महिन्यांपासून नात्यात आहेत. ते त्यांच्या सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमीच त्यांचे फोटो शेअर करत असतात. सुयशचा वाढदिवस आणि त्यात अंजली म्हणजे अक्षया देवधर शुभेच्छा देणार नाही असे होणारच नाही.त्यामुळे अक्षयानेही सुयशच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर केला आणि त्याला समर्पक अशी कॅप्शनीह दिली.शुभेच्छा देत तिने तिने म्हटले की,तुझ्याशिवाय माझे अस्तित्वच नाही,तु माझ्यासाठी नेहमीच स्पेशल असणार आहे.लव्ह यु फॉरेव्हर असा सुंदर मेसेज पोस्ट केला. यावर सा-यांनीच आनंद व्यक्त करत अनेक लाईक्स आणि कमेंटस नेटीझन्स देताना दिसले.त्यामुळे पुन्हा एकदा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळाले. शेअर केलेल्या फोटोमध्ये  दोघांचीही खास केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

सुयश आणि अक्षयाने एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाहिर कबुली आजवर कधीही दिलेली नाही.मात्र एकमेकांबद्दल असलेले प्रेमही ते जगापासून लपवून ठेवू शकले नाहीत.दोघांनीही त्याच्या नात्याबाबत नेहमीच मौन पाळणेच पसंत केले आहे.दोघांमधील प्रेमाच्या चर्चा वारंवार ऐकायला मिळतात.दोघांच्या अफेअरच्याच नाहीतर त्यांच्या साखरपुडा केल्याचीह  खुमासदारपणे चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.दोघांनी गुपचूप साखरपुडा केला असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या.मात्र या बातम्या अगदी चुकीच्या असल्याचे सुयशने स्वतः सांगितले होते.तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे अक्षया देवधर ही घराघरात पोहोचली. तिने साकारलेली अंजलीबाईची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. आज प्रेक्षक तिला अंजली या नावानेच ओळखतात. अक्षयाने या आधी काही नाटकांमध्ये काम केले होते. तसेच सुजय डहाकेच्या शाळा या चित्रपटात देखील ती झळकली होती. पण तिची छोट्या पडद्यावर झळकण्याची ही पहिलीच वेळ असून तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. 
Web Title: Happy Birthday, given by the reader, Boyfriend Suyashla, comments given by fans.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.