Gurung had to bear the consequences of this matter? | भूमिका गुरूंगला या गोष्टीमुळे सहन करावा लागला मनस्ताप?

आजकाल सगळेच सोशल मीडियाचा वापर करताना आपल्याला दिसतात.सोशल मीडिया हा सेलिब्रिटींच्या आयुष्याचा तर अविभाज्य घटक बनला आहे. आपल्या फॅन्सच्या सतत संपर्कात राहाण्यासाठी सेलिब्रिटी फेसबुक,ट्विटरवर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. मात्र हाच सोशल मीडिया एका अभिनेत्रीसाठी डोकेदुखी ठरतोय.चाहत्यांसह कनेक्ट राहण्यासाठी कलाकारमंडळी सोशल मीडियाचा आधार घेत असतात.मात्र आता एका अभिनेत्रीला एका माथेफिरू चाहत्यापासून मनस्ताप सहन करावा लागत आहे.होय, ‘निम्की मुखिया’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी भूमिका गुरुंग या माथेफिरू चाहत्यांची बळी पडली आहे.गेले दोन आठवड्यापासून या चाहत्यामुळे भूमिकाची झोपच उडाली आहे.तो सतत तिला फोन करत त्रास देत असतो. त्याच्याकडे भूमिकाचा फोन नंबर कसा आला याबाबत अजूनही माहिती मिळाली नाहीय. इतकेच नव्हेतर या  चाहत्याने इन्स्टाग्रामवर भूमिकाचे फेक प्रोफाईल बनवत तिच्या मित्र आणि नातेवाईकांना यात अॅडही केले आहे. ‘निम्की मुखिया’ या मालिकेचे प्रोमो प्रसारित झाल्यापासून अनेक चाहत्यांचे असंख्य फोन भूमिकाला येत होते. मात्र आता भूमिकाला चाहत्यांचे अतिप्रेम आणि अतिउत्साह डोकेदुखी ठरत आहे. याविषयी सांगते भूमिका सांगते, “सुरुवातीला मला वाटलं की माझ्या काही मित्रांनी मुद्दाम माझी चेष्टा करण्यासाठी ही खोडी काढली असावी म्हणून मी त्या व्यक्तीशी बोलत राहिले. परंतु लवकरच माझ्या लक्षात आलं की ही व्यक्ती बहुदा माथेफिरू असावी. तो मला दररोज असंख्य मेसेजेस तर पाठवायचाच, पण दिवसातून पाच-सहा वेळा फोनही करायचा.  सोशल मीडियावरील त्याने माझी काही पर्सनल फोटोही इन्स्टाग्रामवर माझ्या नावाने अपलोड केलीत. आता मी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागात त्याच्याविरोधात तक्रार नोंदविली आहे.”सोशल मीडियावर कठोर बंधने घालणे गरजेचे आहे.“इंटरनेटवर तुमचे फोटो नको तिथे दिसू लागले आणि तुमचे दूरध्वनी क्रमांक कोणालाही उपलब्ध होऊ लागले तर सोशल मीडियाचा वापर करण्याचाकाय फायदा? सोशल मीडियावर अभिनेत्री आपले काही ग्लॅमरस छायाचित्रे टाकत असतात, पण त्याचा अर्थ त्या कोणालाही आपला पाठलाग करण्याचे आमंत्रण देतात असा होत नाही. सोशल मीडियावर माझ्या माहितीविषयी छेडछाड करण्याचा कोणालाही अधिकार नाही. ब-याचदा एकदा अभिनेत्री बनल्यानंतर असा प्रकारे घडणेही नॉर्मल असल्याचेही वाटते.मात्र मला असा विचार करणा-या लोकांच्या अकलेची खरंच कीव करावीशी वाटते. दुस-याच्या खाजगी जीवनात हस्तक्षेप करण्याचा कोणालाही अधिकार नाही त्यामुळे वेळीच यावर योग्य तो निर्बंध लावणे करण्याचे आहे. 
Web Title: Gurung had to bear the consequences of this matter?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.