Gurmeet Chaudhary visited The Great Indian Laughter Challenge Setla | गुरमीत चौधरीने भेट दिली दि ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेन्जच्या सेटला

सर्वांचा लाडका अभिनेता गुरमीत चौधरी नुकताच स्टार प्लसवरील कॉमेडी रिॲलिटी शो दि ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेन्जच्या सेटवर दिसून आला. तो ह्या शोवरील कॉमेडी परीक्षक साजिद खान यांना भेटायला आला होता. डान्स रिॲलिटी शो नच बलियेच्या ५ व्या सीजनपासून परीक्षकस्पर्धक अशी ही जोडी  आहे. आपल्या जुन्या मित्राला सेटवर पाहून साजिदला खूप छान वाटले.याबद्दल साजिद म्हणाला, हे अगदीच अनपेक्षित होते. गुरमीतला दि ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेन्जच्या सेटवर पाहून मला  खूपच आनंद झाला.तो सहजच भेटायला आल्याचे त्याने मला सांगितले. तो आला तेव्हा मी त्याला स्टेजवर घेऊन गेलो. तो स्पर्धकांना भेटला आणि त्यांच्याशी बातचीतही केली.

अक्षयकुमार, साजिद खान आणि श्रेयस तळपदे या तीन परीक्षकांमुळे ‘स्टार प्लस’वरील ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमात सध्या खूपच मजा येत आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक बदलल्यानंतर या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.  या कार्यक्रमातील विनोदाचा स्तर आता उंचावत असून स्पर्धा दिवसेंदिवस अधिकच अवघड बनत चालली आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत. त्यामुळे या सगळ्यांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता लोकांना लागलेली आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या एका खास कार्यक्रमात आला लवकरच संकेत भोसलेने हजेरी लावली होती.अक्षयकुमार, साजिद खान आणि श्रेयस तळपदे या तीन परीक्षकांमुळे ‘स्टार प्लस’वरील ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमात सध्या खूपच मजा येत आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक बदलल्यानंतर या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.या कार्यक्रमातील विनोदाचा स्तर आता उंचावत असून स्पर्धा दिवसेंदिवस अधिकच अवघड बनत चालली आहे.या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत. त्यामुळे या सगळ्यांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता लोकांना लागलेली आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या एका खास कार्यक्रमात आला लवकरच संकेत भोसले झळकणार आहे. संकेत संजय दत्त आणि सलमान खान यांची खूपच छान नक्कल करतो. त्याने या कार्यक्रमात देखील त्यांची खूपच छान नक्कल करून दाखवली. याविषयी संकेत सांगतो, “संजूबाबा आणि सलमानभाई या दोघांची नक्कल करणे हा एक छान अनुभव होता. या कार्यक्रमात काही उत्कृष्ट विनोदवीर असून त्यांना विनोद सादर करताना पाहणं आणि त्यांच्याशी चर्चा करण्यात खूप मजा आली.”
Web Title: Gurmeet Chaudhary visited The Great Indian Laughter Challenge Setla
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.