Greetings from the audience of 'Gav Gata Gajali' series | ​'गाव गाता गजाली' मालिका घेणार रसिकांचा निरोप

छोट्या पडद्यावरील गाव गाता गजाली मालिका रसिकांचा निरोप घेणार आहे.अल्पावधीतच या मालिकेने रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली. या मालिकेच्या कथेसोबतच त्याचं शीर्षकगीतसुद्धा हिट झालं होतं.हे शीर्षकगीत जितकं श्रवणीय तितकेच ते बघावसंही वाटत होतं.“मॅड झालस काय,व्हतला व्हतला सगळा व्हतला आणि मी कधी कुणाक काय सांगतंय काय”, हे संवाद अल्पावधीतच रसिकप्रेक्षकांच्या जिभेवर रुळू लागले आणि ही पात्र रोजच्या जगण्याचा भाग बनली होती.मालवणी भाषेत याच गप्पांना गजाली असं म्हटलं जातं.गावागावातल्या भानगडींपासून ते राष्ट्रीय असो किंवा मग थेट परदेशात घडणा-या घडामोडी असो या सगळ्यांवर गप्पांचा फड कोकणातल्या गावागावात चांगलाच रंगतो.इरसाल माणसांच्या याच इरसाल गजाली या मालिकेत दाखवण्यात आल्या होत्या.त्यामुळे आता मालिकेच्या फॅन्सचा हिरमोड करणारी बातमी आहे. कारण ही मालिका आता लवकरच रसिकांचा निरोप घेणार आहे.या मालिकेच्या जागी आता एक नवी कोरी मालिका येणार असे तुम्हाला वाटत असणार तर असं नसून 'जागो मोहन प्यारे' ही मालिका तुम्हाला पाहता येणार आहे.


'चुकभूल द्यावी घ्यावी' या मालिकेच्या जागी 'गाव गाता गजाली' गेल्यावर्षी 2 ऑगस्टला रसिकांच्या भेटीला आली होती.'रात्रीस खेळ चाले' या सुपहरहिट ठरलेल्या मालिकेनंतर कोकणची संस्कृती,तिथली गावं,माणसं आणि मालवणी भाषा हे सगळं वैभव 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा जगासमोर आणलं ते 'गाव गाता गजाली' या मालिकेने. त्यामुळे कोकणचं तेच वैभव आणि संस्कृती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर 'गाव गाता गजाली'च्या माध्यमातून रसिकांनी पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी मिळाली होती.

'गाव गाता गजाली' मालिका बंद होणार ही बातमी रसिकांचा हिरमोड करणारी असली तरी 'ग्रहण' ही नवी मालिका रसिकांच्या भेटीला दाखल होणार आहे.या नव्या मालिकेचे प्रोमो सध्या छोट्या पडद्यावर झळकू लागले आहेत.प्रोमोवरुन या मालिकचे कथानक रहस्यमयी किंवा हॉरर स्वरुपाचे असेल असंच दिसतंय.त्यामुळे 'रात्रीस खेळ चाले' आणि '१०० डेज' या मालिकेनंतर रात्री साडेदहा वाजता पुन्हा एकदा हॉरर कथानक असलेली मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री पल्लवी जोशी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत.
 
Web Title: Greetings from the audience of 'Gav Gata Gajali' series
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.