आणि गोविंदाला आली त्याच्या पहिल्या सिनेमाची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 06:00 AM2018-12-20T06:00:00+5:302018-12-20T06:00:00+5:30

स्टारप्लसवरील लोकप्रिय शो 'डान्स+ ४'मध्ये नुकताच गोविंदाने हजेरी लावली होती. तेव्हा स्पर्धक वर्टिका झा ने त्याच्या इल्जाम चित्रपटातील 'आय ॲम एक स्ट्रीट डान्सर' गाण्यावर परफॉर्म केले

Govinda reminder Ilzaam movie memories | आणि गोविंदाला आली त्याच्या पहिल्या सिनेमाची आठवण

आणि गोविंदाला आली त्याच्या पहिल्या सिनेमाची आठवण

googlenewsNext
ठळक मुद्देगोविंदाचा पहिला चित्रपट ‘इल्जाम’ होताहा चित्रपट पहलाज निहलानीने प्रोड्यूस केला होता आणि शिबू मित्राने दिग्दर्शित केला होता

बॉलीवूडमधील लाडका अभिनेता गोविंदाचे फॅन फोलॉईंग मोठे आहे. त्याची भूमिका कितीही छोटी किंवा मोठी असली तरी आपल्या कामाच्या बाबतीत तो अगदी परफेक्शनिस्ट आहे. स्टारप्लसवरील लोकप्रिय शो 'डान्स+ ४'मध्ये नुकताच गोविंदाने हजेरी लावली होती. तेव्हा स्पर्धक वर्टिका झा ने त्याच्या इल्जाम चित्रपटातील 'आय ॲम एक स्ट्रीट डान्सर' गाण्यावर परफॉर्म केले. तेव्हा गोविंदाला तिची परफॉर्मेन्स खूप आवडला. स्पर्धकांच्या अग्राखातर तो मंचावर आला आणि  स्पर्धकासोबत स्टेप्सचा सराव करणे पसंत केले. त्याने अगदी परफेक्शनसह मूव्ह्‌सचा सराव केला.
 
गोविंद म्हणाला की, 'इल्जाम' हा त्याच्या पदार्पणाचा चित्रपट असल्यामुळे हे गाणे चित्रपट दोनही त्याच्या फार जवळच आहेत. ह्या गाण्यावर पुन्हा एकदा नाचताना त्याच्या आठवणी जाग्या झाल्या.

गोविंदाचा पहिला चित्रपट ‘इल्जाम’ होता. हा चित्रपट १९८६ मध्ये आला होता. या चित्रपटात गोविंदाच्या अपोझिट नीलम, शत्रुघ्न सिन्हा, शशी कपूर, प्रेम चोप्रा आणि अनिता राज होते. हा चित्रपट पहलाज निहलानीने प्रोड्यूस केला होता आणि शिबू मित्राने दिग्दर्शित केला होता. एकेकाळी याच गोविंदाने एकाचवेळी ४९ चित्रपट साईन केले होते. ऐकायला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे.  गोविंदाने स्वत: एका कार्यक्रमात खुसाला केला ‘त्या काळात काम मिळायचे नाही. निर्माते येणार आणि भेटणार, याची आम्ही वाट बघायचो. मी या प्रथेत थोडा बदल केला. मी व्हिडिओ बनवला आणि तो पहलाज निहलानी यांना पाठवला. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी मला हिरो बनवले. मग मी ४९ चित्रपट साईन केले. 
 

Web Title: Govinda reminder Ilzaam movie memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.