Good News...! कपिल शर्माच्या घरी येणार छोटा पाहुणा?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 07:07 PM2019-05-22T19:07:39+5:302019-05-22T19:08:03+5:30

कपिलला नुकतेच ‘वर्ल्ड बुक ऑफ लंडन’कडून भारतातील सर्वाधिक पसंती असलेला स्टँड-अप कॉमेडियन म्हणून सन्मानित करण्यात आले.

Good news ...! kapil-sharma-to-become-father-wife-ginni-chatrath-is-pregnant | Good News...! कपिल शर्माच्या घरी येणार छोटा पाहुणा?

Good News...! कपिल शर्माच्या घरी येणार छोटा पाहुणा?

googlenewsNext

भारतातील सर्वात लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्माच्या नावाचा लंडनमध्येदेखील बोलबाला आहे. लंडनमधील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये कपिलच्या नावाचा समावेश झाला आहे. त्यानंतर आता तो जगभरातील लोकप्रिय कॉमेडी किंग बनला आहे. या आनंदाच्या वार्तेनंतर त्याच्याकडे आणखीन आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे कपिलच्या घरी छोटा पाहुणा येणार असल्याचे बोलले जात आहे. 

कपिल शर्माची पत्नी गिन्नी चतरथच्या प्रेग्नेंसीबाबतची चर्चा सध्या मीडियामध्ये सुरू आहे. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, कपिलची आई त्याच्या मुंबईतील घरी आली असून ती छोट्या पाहुण्याचे स्वागत करण्याची तयारी करते आहे. अद्याप या वृत्ताला कपिल शर्माने अजिबात दुजोरा दिलेला नाही. 


कपिल शर्माने आपल्या बालपणीची मैत्रिण गिन्नी चतरथसोबत डिसेंबर, २०१८मध्ये लग्न केले. या विवाह सोहळाला टेलिव्हिजन व बॉलिवूडमधील कलाकारांना निमंत्रण दिले होते. आपल्या कॉमिक टाइमिंगने कपिल शर्माने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. किस किसको प्यार करूं या चित्रपटातून कपिलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो फिरंगी या चित्रपटातही पहायला मिळाला. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या सिनेमांना हवी तितकी दाद दिली नाही.


२००७ साली कॉमेडी रिएलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिलने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहचला. त्यानंतर त्याने कित्येक शोजमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस, झलक दिखला जा ६ व उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगली पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही आणि त्याने कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. या शोला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे.

Web Title: Good news ...! kapil-sharma-to-become-father-wife-ginni-chatrath-is-pregnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.