Goddess ie Goddess Parvati Thakkar becomes Sethji | ​देवी म्हणजेच प्राची ठक्कर बनणार सेठजी

सेठजी या मालिकेत देवसू या छोट्याशा गावावर राज्य करणाऱ्या सेठजीची एक आगळी वेगळी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिकेत आधुनिकता आणि तंत्रज्ञानाचा वापर न करतानाही स्वयंपूर्ण बनलेले गाव दाखवण्यात आले आहे. या मालिकेच्या वेगळ्या कथानकामुळे या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेच्या कथानकाला आता एक वेगळे वळण मिळणार असल्याचे कळतेय.
या मालिकेच्या आगामी भागात सेठजी तिच्या खोलीत बेशुद्ध असताना देवी म्हणजेच प्राची ठक्कर तिच्याकडील खजिन्यांचा नकाशा चोरणार आहे आणि या नकाशात दिलेल्या मार्गावरून ती एका डोंगरावर पोहोचणार आहे. पण तिथे तिला खजिना न मिळता एक बाबा होमहवन करताना दिसणार आहे. या डोंगरावर असा कोणताही खजिना अस्तित्वात नसल्याचे तो बाबा तिला समजावून सांगणार आहे आणि देवसू गाव हीच खरी दौलत असून सेठजीचे सिंहासन हीच खरी ताकद असल्याचेही तिला सांगणार आहे. त्यामुळे देवीने खजिनाच्या मागे न लागता आपले आचरण सुधारावे आणि एक चांगली व्यक्ती बनावे असा सल्ला तिला देणार आे. त्याची ही शिकवण ऐकून देवीचा पूर्ण कायापालट होणार आहे आणि ही बदललेली देवी गावात परतणार आहे. ती परत आल्यावर तिचा पती भाऊराव सेठजीला मागण्याचा बेत रचणार आहे. त्यामुळे सेठजीला वाचवण्यासाठी देवी तिच्या पतीचा खून करणार असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तिच्या या कठोर निर्णयामुळे सेठजी देवीवर खूश होऊन सेठजी ही तिची पदवी देवीला हबाल करणार आहे. याविषयी प्राची ठक्कर सांगते, या मालिकेच्या कथानकाला एक वळण मिळणार असून प्रेक्षकांना या मालिकेत भविष्यात आणखी नाट्य आणि थरार पाहायला मिळणार आहे. 

Also Read : आठ हजार लोकांमधून अविनाश कुमारची झाली निवड
Web Title: Goddess ie Goddess Parvati Thakkar becomes Sethji
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.