"Glad to see that Sony Max 2 honored Hindi film's crime thriller style through timeless digital awards" - film producer Abhay Chopra | ‘‘आनंद वाटतो की सोनी मॅक्स२ने टाइमलेस डिजिटल अवॉर्ड्‌सच्या माध्यमातून हिंदी सिनेमाच्या क्राईम थ्रिलर शैलीला सन्मानित केले’’ - चित्रपट निर्माता अभय चोप्रा

सोनी पिक्चर्स नेटवर्क्सचा सदाबहार हिंदी चित्रपटांसाठी सादर करणारा चॅनेल ‘सोनी मॅक्स२’ने भारतीय सिनेमाला मानवंदना म्हणून ‘टाइमलेस डिजिटल अवॉर्ड्‌स’ हा वार्षिक डिजिटल पुरस्कार सोहळा सुरू केला आहे. या अनोख्या डिजिटल पुरस्कार सोहळ्याच्या ३र्‍या पर्वाने प्रेक्षकांना हिंदी सिनेमाचा सुवर्णकाळ म्हणजेच ५० व ६०च्या दशकातील ‘सदाबहार’ युगात नेले आहे. हा सुवर्णकाळ बीआर चोप्रा यांच्या चित्रपटांच्या योगदानाशिवाय अपूर्ण राहिला असता. सोनी मॅक्स२चा उपक्रम आणि बीआर चोप्रा फिल्म्सच्या वारशाबाबत बोलताना स्वर्गीय श्री. बी. आर. चोप्रा यांचा नातू अभय चोप्राने हिंदी सिनेमाच्या सुरुवातीच्या काळातील काही रोचक गोष्टी सांगितल्या.

तुम्हाला वाटते का सोनी मॅक्स२चा ‘टाइमलेस डिजिटल अवॉर्ड’ सारखा उपक्रम तरुण पिढीला हिंदी सिनेमाच्या प्रतिष्ठेची जाणीच करून देण्याचा एक चांगला मार्ग आहे?
५० व ६०चे दशक हे खर्‍या अर्थाने हिंदी सिनेमाच्या प्रारंभाचे काळ आहेत. या काळाच्या वारशाने भरपूर काही दिले आहे आणि आपण ते विसरता कामा नये. अशा प्रकाराची उत्तम संकल्पना आणणारे सोनी मॅक्स२ हे एकमेव चॅनेल आहे. अशा संकल्पनेमुळे त्या सुवर्णकाळाची जादू पुन्हा एकदा जागृत करण्यास मदत होते. त्या सुवर्णकाळात उत्तमोत्तम चित्रपट निर्माते उदयास आले, ज्याचा आपल्याला आज फायदा होत आहे. त्यांच्या योगदानाशिवाय आज हिंदी सिनेमा ज्या स्तरापर्यंत पोहोचला आहे तिथपर्यंत पोहचू शकला नसता. सोनी मॅक्स२ ‘टाइमलेस डिजिटल अवॉर्ड्‌स’सह त्यांच्या कार्याला पुन्हा एकदा जिवंत करत आहे. अशा प्रकाराच्या उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना हिंदी सिनेमाच्या सर्वोत्तमतेबाबत माहित होईल. खूपच आनंदाची बाब आहे की तुम्ही ५० व ६०च्या दशकातील सर्वात्तम क्राईम थ्रिलर असलेला चित्रपट ‘इक्तेफाक’चा रिमेक बनवला आहे आणि मूळ चित्रपटाला सोनी मॅक्स२च्या ‘टाइमलेस डिजिटल अवॉर्ड’मध्ये नामांकन मिळाले आहे. 

अशा उपक्रमांच्या माध्यमातून या कल्ट क्लासिक चित्रपटाला पुन्हा सादर करण्याचा विचार तुझ्या मनात कसा आला?
‘इक्तेफाक’ हा माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे आणि म्हणूनच मी या चित्रपटाचा रिमेक केला. माझ्या आजोबांची निर्मिती असलेला मूळ चित्रपट हा निश्‍चितच सुपरहिट चित्रपट आहे. आश्‍चर्यासोबतच आनंदाची बाब आहे की सोनी मॅक्स२ने ‘टाइमलेस डिजिटल अवॉर्ड्‌स’च्या माध्यमातून हिंदी सिनेमाच्या क्राईम थ्रिलर शैलीला सन्मानित केले आहे. ही शैली त्या काळातील 
हिट शैलींपैकी एक होती. मला आनंद होत आहे की कोणाच्यातरी लक्षात आले आहे की त्या काळातील चित्रपटांना सर्वोत्तम चित्रपट या एकमेव विभागामध्येच विभागता येऊ शकत नाही. त्या काळातील चित्रपटांमध्ये शैलीव्यतिरिक्त अमर प्रेमकथांसारख्या बर्‍याच गोष्टी समाविष्ट होत्या. 

एक चित्रपट निर्माता म्हणून तुम्हाला आजच्या काळातील तरुण चित्रपट निर्मात्यांच्या अनुकूल व प्रतिकूल स्थितींबाबत काय वाटते, ज्यांचा शक्यतो त्या काळातील चित्रपट निर्मात्यांना सामना करावा लागला नसेल?
निश्‍चितच जुन्या काळातील चित्रपट निर्मात्यांना प्रतिकूल स्थितीचा सामना करावा लागला. त्याकाळी तंत्रज्ञान तितकेसे प्रगत नव्हते. तंत्रज्ञान काही विशिष्ट चित्रपट निर्मितीपुरतीच मर्यादित होते. आज आपल्याला सर्वोत्तम तंत्रज्ञान उपलब्ध आहे, ज्यामुळे आपण चित्रपटप्रेमींना पाहण्यास आवडणारे सीन्स निर्माण करू शकतो. पण त्या काळातील चित्रपट निर्मात्यांना तंत्रज्ञानाबाबत
चिंता नव्हती. त्यांचे उत्तम कथा, उत्तम पात्रे व उत्तम कन्टेन्ट सादर करण्यावर अधिक लक्ष होते. ही अनुकूल स्थिती आज आपल्यासाठी प्रतिकूल बनली आहे. कारण आजच्या पिढीतील अनेक चित्रपट निर्माते विसरले आहेत की चित्रपट बनवणे म्हणजे उत्तम कथा सादर करणे. कोणत्याही चित्रपटाचे सार हे तंत्रज्ञानावर नव्हे तर कथेवर अवलंबून असते.

तरुण चित्रपट निर्माते सेल्यूलॉईड ऐवजी डिजिटल शूटिंग करण्याला अधिक प्राधान्य देतात. याबाबत तुमचे मत काय आहे?
एक चित्रपट निर्माता म्हणून मला निश्‍चितच सेल्यूलॉईडवर शूटिंग करायला आवडेल. पण विशिष्ट सीनसाठी डिजिटलची गरज असेल तर माझी त्याचा वापर करण्यासही कोणतीच हरकत नसेल. सेल्यूलॉईड व डिजिटल या दोघांचे फायदे-नुकसान आहेत. पण व्यक्तिशः मी चित्रपट निर्मितीसाठी डिजिटल पद्धतीचा वापर करणार नाही.

सोनी मॅक्स२च्या ‘टाइमलेस डिजिटल अवॉर्ड्‌स’मध्ये सहभागी होण्यासाठी प्रेक्षकांनी
cnxoldfiles/ इथे लॉगइन करावे.
Web Title: "Glad to see that Sony Max 2 honored Hindi film's crime thriller style through timeless digital awards" - film producer Abhay Chopra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.