The gift given to Param Singh by Diwali himself | परम सिंगने दिवाळीला स्वतःला दिले हे गिफ्ट
परम सिंगने दिवाळीला स्वतःला दिले हे गिफ्ट


दिवाळीच्या निमित्ताने एकमेकांना फराळ, मिठाई व गिफ्ट्स दिले जातात. मात्र छोट्या पडद्यावरील अभिनेता परम सिंगने यंदाच्या दिवाळीत दुसऱ्या कोणाला नाही तर स्वतःलाच गिफ्ट दिले आहे. त्याने स्वतःसाठी लक्झेरियस कार गिफ्ट म्हणून घेतली आहे. परम सिंग स्टार प्लस वाहिनीवरील मालिका मरियम खान - रिपोर्टिंग लाइव्हमध्ये पत्रकार फवादची भूमिका साकारतो आहे. 

परम सिंगने स्वतःला मर्सेडिज सीएलए अर्बन स्पोर्ट ही कार गिफ्ट म्हणून दिली आहे. या गिफ्टबद्दल त्याने सांगितले की, ही कार माझ्या डोक्यात बऱ्याच कालावधीपासून होती आणि शेवटी मी रेड सीएल ए स्वतःला गिफ्ट म्हणून दिली. स्वतःच्या परिश्रमातून घेतलेली वस्तूमधून खूप समाधान मिळते. 

‘मरियम खान - रिपोर्टिंग लाईव्ह’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही मालिका छोटी मुलगी मरियम आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घटनांवरील तिच्या दृष्टिकोनाची गोष्ट आहे.या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे आई आणि मुलीचे नाते म्हणजे मरियम आणि तिची आई ऊर्फ रूख्सार रेहमान यांच्यामधील नाते. या मालिकेत परम सिंग प्रथमच एका गुन्हेगारी पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार असून तो मरियमच्या आयुष्याशी निगडित एका सत्याचा वेध घेताना दिसेल. आपल्या या नव्या भूमिकेवर प्रकाश टाकताना परमसिंह सांगतो, “या मालिकेची संकल्पनाच अगदी वैशिष्ट्यपूर्ण असून त्यामुळेच मी या मालिकेतील ही भूमिका स्वीकारली. यात मी एका क्राइम रिपोर्टरची भूमिका रंगविणार आहे. शिवाय यातील माझी फवादची भूमिका ही मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. 


Web Title: The gift given to Param Singh by Diwali himself
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.