Ganpati Celebration In Laxmi Sadaiv Mangalam Tv Serial | बाप्पाच्या आगमनाने लक्ष्मीच्या आयुष्यात सुखाची चाहूल !
बाप्पाच्या आगमनाने लक्ष्मीच्या आयुष्यात सुखाची चाहूल !

सगळीकडेच सध्या मंगलमय वातावरण आहे. कारण घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे.  गणरायाच्या आगमनाने भक्ताच्या आयुष्यातील सगळी विघ्न, चिंता दूर होतात कारण तो विघ्नहर्ता आहे. छोट्या पडद्यावरील 'लक्ष्मी सदैव मंगलम्', 'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेमध्ये गणरायाची स्थापना झाली आहे. गणपतीच्या आगमनाने लक्ष्मीच्या आयुष्यातील चिंता आणि संकट दूर होणार आहे. मालिकेमध्ये मोठ्या संकटाना पार करून खूप अडचणींना सामोरे जात लक्ष्मीचे लग्न मल्हारसोबत झाले होते. परंतु तो तिला स्वीकारू शकला नाही कारण त्याचे आर्वीवर जीवापाड प्रेम आहे. परंतु आता मालिकेमध्ये मात्र गणरायाचे आगमन झाले आहे, मल्हार बाप्पाला घरी मोठ्या थाटा घेऊन येताना दिसणार आहे आणि त्याच्या साथीला असणार आहे त्याची बायको म्हणजेच लक्ष्मी. 

लक्ष्मी घराची सून म्हणून गणरायाचे स्वागत करणार आहे. बाप्पाच्या आगमनाने लक्ष्मीच्या आयुष्यात सुखाची चाहूल लागली आहे. गणरायाच्या आगमनासाठी लक्ष्मी खूप सुंदर अशी नटली असून तिने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे, गजरे, नथ हातामध्ये हिरव्या रंगाचा चुडा घातला आहे. हे बघणे रंजक असणार आहे.

'लक्ष्मी सदैव मंगलम' ही मालिका शहर आणि गावं यांच्यातला दुरावा कमी करणारी मालिका आहे. शहरातल्या धुसमळत्या प्रेमाला अस्सल ग्रामीण प्रेमाने रंगवणाऱ्या या मालिकेमध्ये अतिशय निरागस आणि अवखळ अशा लक्ष्मीचा प्रवास दाखवण्यात आलेला आहे. मालिकेमध्ये अनुभवी कलाकारांचा संच आणि अनोखी संकल्पना असल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना आवडत आहे. मल्हार परदेशी शिकून गावी आलेला असल्याचे दाखवण्यात आले आहे तर आर्वी ही डॉक्टर असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले. या मालिकेच्या टीमने केक कापून आपला हा आनंद साजरा केला. यावेळी मालिकेतील सगळेच कलाकार, तंत्रज्ञ सेटवर उपस्थित होते. या मालिकेचे नाव आणि नॉट आउट १०० असे या केकवर लिहिण्यात आलेले होते. ही मालिका सुरू झाल्यापासूनच ही मालिका आणि मालिकेतील कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकत आहे.
 


Web Title: Ganpati Celebration In Laxmi Sadaiv Mangalam Tv Serial
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.