The first photo of the child was shared on social media, shared on social media | छोट्या पडद्यावरची नव्या झाली आई, सोशल मीडियावर शेअर केला बाळाचा पहिला फोटो


छोट्या पडद्यावर नई धडकन नई सवाल'मालिकेतील नव्याची भूमिका साकारणारी सौम्या सेठ आई झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.तिने तिच्या बाळाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बाळाच्या पायाचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करताच तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  सौम्याने याचवर्षी 15 जानेवारी रोजी अमेरिकेत वास्तव्यास असणा-या अरुण कपूरसोबत सिक्रेट मॅरेज केले होते. सौम्याच्या लग्नाची इंडस्ट्रीमधील एकाही सेलिब्रिटीला माहिती नव्हती.या खासगी सोहळ्यात फक्त कुटुंबिय सहभागी झाले होते. विशेष म्हणजे लग्नाच्या 9 महिन्यातच सौम्या आई झाली आहे.छोट्या पडद्यावर सौम्याने 'दिल की नजर से खूबसूरत' 'ये है आशिकी' 'एमटीवी वेब्ड' 'चक्रवर्ती अशोका सम्राट'मालिकेतून ती झळकळी.मात्र चक्रवर्ती अशोका सम्राट मालिकेतूनती जास्त प्रकाशझोतात आली होती.तिच्या प्रेग्नंसी दरम्यान ती खूप अॅक्टीव्ह दिसली. त्या दरम्यान ती जास्त तिची प्रेग्नंसी एन्जॉय करत असल्याचे तिच्या फोटोंमध्ये पाहायला मिळाले.तिने तिच्या प्रेग्नंसीदरम्यान खास फोटोशूटही केले होते. 

'चक्रवर्ती अशोक सम्राट' ही आजच्या टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त आवडत्या ऐतिहासिक नाट्यमय मालिकांमधील एक आहे. या मालिकेत कौरवकीच्या भूमिकेत सौम्या सेठ झळकली होते.सौम्याही बॉलिवूडचे चीची म्हणजेच गोविंदाची भाची आहे.मात्र अभिनय क्षेत्रात असताना तिने कधीच गोविंदाची ती भाची असल्याचे समोर येऊ दिले नाही.मुळात नेहमीच तिने स्वबळावर या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत यश मिळवले असल्याचे सांगितले.सध्या सौम्याने मालिकेतून ब्रेक घेतला असला तरीही ती लवकरच चांगला प्रोजेक्टची ऑफर आली तर छोट्या पडद्यावर परतणार असल्याचे म्हटले होते. आता तर तिच्या आयुष्यात एका चिमुकल्याचे आगमन झाल्यामुळे सध्या तरी तिने तिच्या करिअरचा कोणताच विचार केलेला नाहीय.सध्या बाळाची काळजी घेण्यात आणि पर्सनल लाईफ एन्जॉय करताना दिसतेय.   
Web Title: The first photo of the child was shared on social media, shared on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.