Finally, Aditya Narayan Narla | अखेर आदित्य नारायण नरमला.. वडिलांच्या सांगण्यावरुन मागितली माफी

गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण सध्या मीडियामध्ये खूप चर्चेत आहे. आदित्यचे एअरपोर्टवरचे व्हिडिओ खूप व्हायरल झाले. ज्यात आदित्य एअरपोर्टवरच्या अधिकऱ्यांशी गैरवर्वतन करताना दिसतो आहे. हा व्हिडिओ माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता. यानंतर उदित नारायण यांनी सांगितले होते की आदित्य आपल्या कृत्याबाबत लवकरच सगळ्यांनसमोर येऊन माफी मागेल. आता वडिलांचा शब्द आदित्य कसा नकारु शकतो. मुंबई मीररच्या रिपोर्टनुसार आदित्यने सा रे गा मा पा च्या सेटवर सगळ्यांना समोर माफी मागितली आहे. आदित्य म्हणाला की, जे काही घडले त्याबाबत मला पश्चाताप आहे. तुम्हाला माहितच आहे की मी असाच आहे. भारतीय प्रेक्षकांचा मी आभार आहे त्यांनी दिलेले प्रेम आणि सपोर्टबदल.  

काही दिवसांपूर्वी आदित्यने रायपूर एअरपोर्टवर एका एअरलाईन्स अधिकाऱ्यासोबत हुज्जत घातली होती. मित्रांसोबत रायपूर एअरपोर्टवरुन परतताना जास्तीचं सामान बाळगल्यामुळे एअरपोर्टवरील अधिकाऱ्यांनी आदित्य नारायणला अडवलं होतं. जास्तीचं सामान बाळगल्यामुळे त्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली होती. पण आदित्यने अधिकाऱ्यांसोबत वाद घातला आणि त्याला मुंबईत ये तुला बघून घेऊन अशी धमकी सुद्धा दिली. व्हायरल झालेल्या व्हिडिओत त्या अधिकाऱ्यावर ओरडताना दिसतो आहे. "इथं 10 लोक आहे आणि सगळे जण पाहत आहे. आधी तुम्ही मला शिवीगाळ करण्यास सांगितलं त्यानंतरच मी शिवी दिली. तुम्ही मला सांगताय शिवी देण्याचा अधिकार नाही. पण मला जे बोलायचं आहे ते मी बोलणारच असा दम आदित्यने अधिकाऱ्यांना भरला. आदित्य एका शोमध्ये परफॉर्म करण्यासाठी रायपूरला गेला होता. यानंतर आदित्यची ट्वीटरवर चांगलीच खिल्ली उडविली गेली होती.  

ALSO  READ : ‘या’ सेलिब्रिटींनी पब्लिक प्लेसमध्ये घातला ‘तमाशा’!

याआधी ही आदित्यने कॉलेजमध्ये असतानासुद्धा  कॉलेजमधल्या सिक्युरिटी गार्डसोबत हुज्जत घातली होती. त्यानंतर त्याला कॉलेजमधून सस्पेंड करण्यात आले होते असे ट्वीट एक मुलीने केले होते. मात्र काही वेळातच तिने आपले ट्वीट डिलीट मारले होते. 

Web Title: Finally, Aditya Narayan Narla
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.