Fernáj Shetty will replace Neha Saxena in the Siddhi Vinayak series | सिद्धीविनायक मालिकेत नेहा सक्सेनाची जागा घेणार फर्नाझ शेट्टी

सिद्धीविनायक मालिकेने अगदी बॉलिवुड स्‍टाइलप्रमाणे प्रेक्षकांना अद्वितीय पटकथा, चांगले-वाईट अनुभव, ड्रामा, रोमान्स असे सारे काही दिले आहे. आता पुन्हा एकदा या मालिकेत उत्कंठा वाढवणारे प्रसंग घडणार आहेत. आगामी भागात प्रेक्षकांना सुप्रसिद्ध चित्रपट 'ओम शांती ओम'ची झलक पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात स्‍टुडिओ सेटला लागलेल्‍या आगीत दीपिका पादुकोण अडकते, असे दृश्य होते. अगदी त्‍याचप्रमाणे सिद्धी (नेहा सक्‍सेना) देखील अशाच स्थितीमध्‍ये सापडणार आहे. चित्रपटामध्‍ये दीपिकाचा मृत्‍यू झालेला दाखवण्‍यात आला आहे, सिद्धीच्या (नेहा सक्‍सेना) नशिबातही हेच असेल का? हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे.
सिद्धीविनायक या मालिकेत आता अभिनेत्री फर्नाझ शेट्टी दिसणार आहे. अगदी फिल्‍मी अंदाजमध्‍ये नेहा सक्‍सेनाच्‍या जागी फर्नाझ शेट्टीची एंट्री होणार आहे. &TV वरील वारिस या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा याच वाहिनीसोबत काम करायला मिळत असल्याने ती सध्या चांगलीच खूश झाली आहे. सिद्धीविनायक या मालिकेतील तिची भूमिका ही वारिस या मालिकेतील भूमिकेपेक्षा खूपच वेगळी असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना फर्नाझला एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. याबाबत फर्नाझ सांगते, ''मी मालिकांमधून काहीसा ब्रेक घेत कलाकार म्‍हणून माझे कौशल्‍य वाढवण्‍याचा विचार करत असतानाच मला सिद्धीविनायक मालिकेबाबत विचारण्‍यात आले. मालिकेच्‍या टीमने मला या भूमिकेबाबत सांगितले, तेव्‍हा मला ही भूमिका आव्‍हानात्‍मक वाटली. मी अशा प्रकाराची भूमिका याअगोदर कधीच केली नव्‍हती. ही चौथी वेळ आहे, जेथे मी दोघांमधील बालपणीच्‍या प्रेमाभोवती फिरणाऱ्या कथेचा भाग असणार आहे. कथा उत्‍तम आहे पण आव्‍हान तितकेच कडवे आहे. प्रेक्षकांमध्‍ये सिद्धीबाबत निश्चित प्रतिमा तयार झाली आहे. मी आशा करते की मी दर्शकांच्‍या अपेक्षांवर खरी उतरेन आणि या मालिकेचा भाग बनत उत्‍तम अभिनय सादर करेन. भूमिका आणि मालिकेची संकल्‍पना समजून घेण्‍यासाठी सिद्धीविनायक मालिकेचे मागील काही भाग मी बारकाईने पाहत आहे. मी आशा करते की प्रेक्षकांना माझा अभिनय आवडेल आणि ते माझे कौतुक करतील.''

Also Read : ​फर्नाझ शेट्टी झळकणार झी टीव्हीवरील फिअर फाईल्समध्ये
Web Title: Fernáj Shetty will replace Neha Saxena in the Siddhi Vinayak series
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.