'Fascers' Fame Mitali Mayekar tattoo photos of gloves | 'फेशर्स' फेम मिताली मयेकरने गोंदला डॉगीचा फोटो टॅटू

फ्रेशर्स फेम मिताली मयेकर हिने 'ऑलवेज' या तिच्या पहिल्या टॅटू नंतर आता अजून एक नवीन टॅटू केला आहे. मिताली मयेकर ही तिचा व्हॅलेंटाईन्स डे तिच्या पेट्स सोबत साजरा करते हे तर आपल्याला माहितीच आहे पण मितालीचा हा नवा टॅटू देखील तिच्या या खास व्हॅलेंटाईन म्हणजे तिची पेट डोरासाठीच आहे. मितालीला कुत्र्यांची फार आवड आहे, त्यामुळे तिने डोराचं नाव न लिहिता एकंदरीतच सर्व कुत्र्यांवर असलेलं प्रेम दाखवण्यासाठी हा टॅटू केला आहे आणि या मुक्या प्राण्यांसाठी टॅटू काढताना ज्या वेदना झाल्यात त्या अगदी वर्थ आहेत असं मितालीचं म्हणणं आहे.मितालीला जशी टॅटू काढण्याची आवड आहे तसेच तिला मोमोज चीनी मोदकही खूप आवडतात.दिवसभरात मिताली कमीत कमी एकदा तरी मोमोज खातेच,सेट वर सुद्धा तिच्या खाण्यात मुद्दाम मोमोज आणले जातात.मोमोज पाहिल्यानंतर मितालीच्या चेह-यावरील आनंद बघण्यासारखा असतो. चीनी मोदक ही मितालीची आवडती डिश आहे.मिताली ही शाकाहारी जेवण जेवत असल्याने तिला व्हेज मोमोज आवडतात.ठाण्यामध्ये एक फक्त मोमोज चे हॉटेल आहे तिथे ती फक्त मोमोज खाण्यासाठी नेहमीच जाते.
Web Title: 'Fascers' Fame Mitali Mayekar tattoo photos of gloves
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.